31.3 C
Ratnagiri
Friday, May 24, 2024

रत्नागिरीजवळ अपघात रिक्षाचालकाचा मृत्यू

रिक्षाचे ब्रेक निकामी झाल्याने रिक्षा पलटी होऊन...

दापोलीतील महिलेच्या मृत्यूचे गूढ वाढले, नातेवाईकांना घातपाताचा दाट संशय

तालुक्यातील वणंद येथील ५० वर्षीय महिलेच्या मृत्यूचे...

महावितरणला ५७२ कोटीचा प्रकल्प मंजूर

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण योजनेतून...
HomeSindhudurgमोर शराटीचे युरोपमधून सिंधुदुर्गात आगमन

मोर शराटीचे युरोपमधून सिंधुदुर्गात आगमन

युरोप मधून स्थलांतर करून आलेला मोर शराटी पक्षाचे कोकणात आगमन झाले आहे. हा पक्षी तळकोकणातील जिथे पाणथळ भाग किंवा दलदली भाग असेल तिथे वास्तव्यला आले आहेत.

युरोप मधून स्थलांतर करून आलेला मोर शराटी पक्षाचे कोकणात आगमन झाले आहे. हा पक्षी तळकोकणातील जिथे पाणथळ भाग किंवा दलदली भाग असेल तिथे वास्तव्यला आले आहेत. सध्या तळकोकणातील सागरी महामार्गालगत असलेल्या पाणथळ भागात मध्य युरोप येथून आलेल्या परदेशी पाहुण्याचे थवेच्या थवे बघायला मिळत आहेत. वेंगुर्ले तालुक्यातील न्हयची आडमध्ये पाणथळ भागामध्ये बगळ्यांच्या सोबत मोर शराटी हे परदेशी पक्षी एकत्रित वावरताना पहायला मिळतात. प्रत्यक्ष पाहिलं तर ते हुबेहूब मोरांप्रमाणे भासत असल्याने या पक्षांना मोर शराटी असे म्हटलं जात. त्यांचे वास्तव्य हे मुख्य करून पाणथळ भागामध्येच असून इतर पक्षांची घरटी वापरून त्याठिकाणी काही काळ राहतात. सागरी महामार्गावरून जाणारे पर्यटक याठिकाणी काही काळ तिथे थांबून या पक्षांचे निरीक्षण करत असतात. हिवाळ्यात हे पक्षी शेकडो किलोमीटरचा प्रवास करून सिंधुदुर्गात येतात.

Glossy Ibis in kokan

मोर शराटी पक्षी साधारपणे ६० सें. मी. आकाराचा असून लांबून पाहिला तर त्याचा रंग पूर्ण काळा दिसतो मात्र प्रत्यक्ष जवळ जावून पाहिल्यावर त्यात काळ्यासह हिरवट-तांबूस रंगाची छटा असणारा हा पक्षी आहे. वीणीच्या हंगामामध्ये नराचा रंग जास्त चमकदार जाणवतो. एरवी पाहायला गेलो तर नर आणि मादी मध्ये विशेष फरक जाणवत नाही, ते दिसायला सारखेच दिसतात. हे पक्षी कायम थव्यानेचं राहतात, एवढा मोठा प्रवास सुद्धा ते पक्षी थव्यानेच एकत्रित रित्या करतात. भारताच्या महाराष्ट्र, गुजरात, ओडिशा, आसाम, मणिपूर, पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश, केरळ, यूपी, आंध्र प्रदेश या राज्यात मोर शराटी हा पक्षी प्रामुख्याने आढळतो, तसेच पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका या आशियाई देशामध्येही हिवाळी वातावरणात हे पक्षी युरोपमधून स्थलांतरीत होतात.

कमी जास्त प्रमाणात पण थव्यानेचं हे पक्षी दिवसभर खाण्याचा शोध घेत असतात. तसेच काही वेळेला उथळ पाण्यामध्ये चोच बुडवून एकट्याने खाद्य शोधतात. मोर शराटी पक्ष्याचे खाद्य बेडूक, मासोळ्या, खेकडे सरडे, गोगलगाय वगैरे पाण्यात राहणारे जीव हेचं असते. साधारणपणे त्यांचा विणीचा हंगाम हा नोव्हेंबर ते मे दरम्यान असते. यांचे स्वतःचे असे घरटे नसतेच परंतु, एकतर त्यांचे घरटे पाण्यात उभ्या असलेल्या दांडक्यांवर किंवा उंच झाडांवर काटक्या वापरून तयार करतात. बगळ्यांची घरटीही बहुधा अशाच प्रकारच्या झाडांवर बांधलेली असतात.

RELATED ARTICLES

Most Popular