31.7 C
Ratnagiri
Monday, May 20, 2024

चिपळूणला सलग दुसऱ्या दिवशी वादळी वारा

शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी सायंकाळी चिपळूण आणि...

कोकणातील तब्बल ६१३ गावे दरडीच्या सावटाखाली

कोकणातील शेकडो गावे आजही दरडींच्या सावटाखाली आहेत....

कोकणात वादळामुळे महावितरणला ५१ लाखांचा फटका

चिपळूण व गुहागर तालुक्यात झालेल्या वादळी वारा...
HomeSportsपोलार्ड नवीन विक्रमाला सज्ज

पोलार्ड नवीन विक्रमाला सज्ज

कायरन पोलार्ड आयपीएलच्या कारकीर्दीमध्ये 200 षटकार लगावणारा खेळाडू म्हणून विक्रम करण्यासाठी सज्ज आहे.

इंडियन प्रीमियर लीग 14 व्या सीझनच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू पोलार्ड नवीन विक्रम घडविण्याच्या तयारीमध्ये आहे. कायरन पोलार्ड आयपीएलच्या कारकीर्दीमध्ये 200 षटकार लगावणारा खेळाडू म्हणून विक्रम करण्यासाठी सज्ज आहे. केवळ दोन षटकार मारून हा विक्रम पोलार्ड स्वत:च्या नावे करुन घेऊ शकतो. 2010 मध्ये कायरन पोलार्ड याने पदार्पण केल्यापासूनच मुंबई इंडियन्स मधील महत्त्वाचा खेळाडू बनला आहे. पोलार्डने आतापर्यंत 164 आयपीएल सामने खेळले असून, 164 सामन्यांच्या 147 डावांत पोलार्डने 198 षटकार ठोकले आहे. आरसीबीच्या विरुद्धच्या सामन्यामध्ये निव्वळ दोन षटकार लगावून पोलार्ड आयपीएल मधील 200 षटकार लगावण्याचा मान मिळवण्याची संधी चालून आली आहे.

पोलार्डचा रेकॉर्ड आयपीएलमध्ये कायमच विक्रमी राहिला आहे. पोलार्डने 147 डावांमध्ये जवळपास 30 च्या सरासरीने 150 स्ट्राइक रेटने 3023 धावा केलेल्या आहेत. तसेच आयपीएलमध्ये 15 अर्धशतकं पोलार्डने केली आहेत. 83 धावांचा त्याचा सर्वाधिक स्कोअर आहे. मुंबई इंडियन्ससाठी फलंदाजी व्यतिरिक्त पोलार्डने गरजेच्या वेळी उत्कृष्ट गोलंदाजी करत जबाबदारीची भूमिका निभावली आहे. पोलार्डने आयपीएलच्या 92 सामन्यांमध्ये गोलंदाजी करत 60 विकेट्स घेतले आहेत.

Kieron Pollard new record

कायरन पोलार्ड हा आयपीएलमध्ये 200 षटकार लगावण्याचा विक्रम करणारा एकमेव खेळाडू नसून,  यापूर्वीही अनेक खेळाडूंनी हा विक्रमावर आपले नाव कोरले आहे. आयपीएलमध्ये पोलार्डपूर्वी अन्य 5 फलंदाजांनी 200 हून अधिक षटकार लगावण्याचा विक्रम केला आहे. क्रिस गेलच्या नावावर सर्वाधिक षटकार लगावण्याचा प्रथम विक्रम आहे. त्याने आयपीएलमध्ये एकूण 349 षटकार मारले आहेत. विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल याबाबतीत अव्वलस्थानी आहे. त्याने २००९ ते २०२० सालच्या  १३२ आयपीएल सामन्यांमध्ये खेळताना सर्वात जास्त असे ३४९ षटकारांचा रेकॉर्ड केला आहे. त्यानंतर एबी डिविलियर्स २३५ षटकारांच्या संख्येने दुसऱ्या स्थानावर आहे. तर त्या पाठोपाठ महेंद्रसिंग धोनी याची २१६ षटकार,  रोहित शर्मा याने २१३ षटकार व विराट कोहलीने २०१ षटकार लगावून यांचाही टॉप-५ मध्ये स्थान आहे.

०९ एप्रिल पासून इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा महासंग्राम सुरू होणार आहे. आयपीएल २०२१ चा पहिला सामना कोरोनाच्या संकटाखाली एमए चिंदबरम स्टेडियम, चेन्नई येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात रंगणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ७.३० वाजता या सामन्याला सुरूवात होणार असून, या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सचा ऑलराउंडर फलंदाज पोलार्ड याला मोठा विक्रम घडविण्याची संधी आली आहे. ३३ वर्षीय पोलार्डने साल २०१० पासून ते आतापर्यंत १६४ आयपीएल सामने खेळले असून एकूण ३०२३ धावा केल्या आहेत. लांबच्या लांब चौकार-षटाकारांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या पोलार्डने एकूण १९८ षटकार मारलेले आहेत. अशात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्धच्या पहिल्या आयपीएल सामन्यात त्याने २ चेंडूंना सीमा रेषेपार पोहोचवले तर तो आयपीएल कारकिर्दीतील २०० षटकार पूर्ण करेल. त्यासोबतच आयपीएलमध्ये असा विक्रम रचणारा तो सहावा आणि मुंबई इंडियन्सचा दुसरा फलंदाज ठरु शकतो.

RELATED ARTICLES

Most Popular