26.1 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeIndiaअखेर गोवा आणि उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री पदाच्या नावाची घोषणा

अखेर गोवा आणि उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री पदाच्या नावाची घोषणा

दोन्ही राज्यांमध्ये भाजपा पक्ष श्रेष्ठींकडून नक्की कोणाला संधी मिळणार यासंदर्भात चर्चा सुरू होती.

देशातील विधानसभा निवडणुका गोवा, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये पार पडल्या. १० मार्चला सर्व राज्यांचे निकाल जाहीर झाले. जास्त करून भाजपाच्या जागा सर्व ठिकाणी निवडून आल्या. त्यानंतर उत्तर प्रदेश, पंजाब आणि मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. परंतु गोवा आणि उत्तराखंडमधील जागी कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता लागून होती. या दोन्ही राज्यांमध्ये भाजपा पक्ष श्रेष्ठींकडून नक्की कोणाला संधी मिळणार यासंदर्भात चर्चा सुरू होती.

गोव्यात प्रमोद सावंत यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदाची संधी मिळणार की नाही, याकडे सर्व जनतेचे लक्ष लागलं होतं. परंतु अखेर पुन्हा गोव्याचे मुख्यमंत्री पदी प्रमोद सावंत यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाला आहे.  तर उत्तराखंडमध्येही निवडणूक हरले असले तरी पुष्कर सिंह धामी यांना संधी देण्यात आली आहे.

भाजपाने मुख्यमंत्री पदी गोव्यात पुन्हा प्रमोद सावंत यांना संधी दिली आहे. पक्षाने पुन्हा एकदा प्रमोद सावंत यांच्यावर विश्वास दाखविला आहे. झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय निरीक्षक नरेंद्र सिंग तोमर आणि एल मुरुगन यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. प्रमोद सावंत यांची मुख्यमंत्री पदावर नेमणूक झाल्यावर, गोव्यात दुसऱ्या वेळेस भाजपा सरकारचे नेतृत्व राहणार आहे. मनोहर पर्रीकर यांच्या दु:खद निधनानंतर २०१९ मध्ये सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली होती.

दरम्यान,  भाजपाने उत्तराखंडच्या मुख्यमंत्री पदी कोणाची वर्णी लागणार याचे देखील नाव जाहीर केले आहे. भाजपाने पुन्हा एकदा आपल्या जुन्या माणसावरच विश्वास दाखवला आहे. उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री पदी पुष्कर सिंह धामी यांच्या नावावर पक्षाच्या बैठकीत एकमत झाले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular