प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत जिल्ह्याला १९ हजार ५२५ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. राज्यातील १० लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित करणे व राज्य, जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरांवर कार्यक्रमाचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार उद्या (ता. २२) येथील शामराव पेजे सभागृहात सायंकाळी पावणेपाच वाजता कार्यक्रम होणार आहे. या योजनेअंतर्गत १९ हजार ३०० प्रस्ताव मंजूर असून, १२ हजार ६६४ जणांना पहिला हप्ता वितरित होणार आहे. लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पूजार यांनी दिली. जिल्हा परिषदेत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदे ते बोलत होते. ते म्हणाले, शासनाकडून आपल्याला आजपर असे उद्दिष्ट आले नव्हते. त्यामुळे जे प्रस्ताव येत होते त्याची शहानिशा करून आपण मंजूर केले. त्यामुळे २०१६ पासून २०२४ पर्यंत आपल्याकडे एकही प्रस्ताव प्रलंबित नाही. ६९ घरकुलांचे काम अपूर्ण होते; परंतु बहुतेकांनी आपल्या स्तरावर ती बांधून घेतल्याने आपल्याकडे प्रस्ताव प्रलंबित नाहीत.
आता आपण ग्रामसेवकांकडून घरकुल आवास योजनेअंतर्गत सव्र्व्हे करून घेतला आहे. त्यासाठी लाभार्थ्यांचे कच्चे घर असावे, त्याच्या घरी टीव्ही, दुचाकी नसावी, वार्षिक उत्पन्नाचा स्तर कमी असावा, असे अनेक निकष लावण्यात आले आहेत. याबाबत सर्व्हे झाल्यानतंर ग्रामपंचायतीकडून याद्या मागविण्यात आल्या आहेत. लाभार्थ्याला घरकुलासाठी १ लाख ३० हजार रुपये मंजूर होणार असून, त्यांना पहिला पंधरा हजाराचा हप्त वितरित केला जाणार आहे. पहिला हप्ता वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. १०० लाभार्थ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ग्रामपंचायत स्तरावर दिसण्यासाठी स्क्रीन, एलसीडी प्रोजेक्टर व इंटरनेटची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी शामराव पेजे सभागृहामध्ये व्यवस्था करण्यात येणार आहे, असे पुजार यांनी सांगितले.