रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक पटकावित सुवर्ण पदक आपल्या नावावर केले आहे. महाविद्यालयाच्या ‘हिरो’ या तृतीय पंथीयांवर आधारित शॉर्ट फिल्मला प्रथम क्रमांक मिळाला असून उत्कृष्ट पटकथा हा पुरस्कार शुभम शिवलकर या विद्यार्थ्याला मिळाला आहे.
भारतीय स्त्री शक्ती आणि नाट्यशास्त्र विभाग मुंबई विद्यापीठ व मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने नॅशनल शॉर्ट फिल्म स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा दिनांक ३ जानेवारी रोजी पार पडला. यामध्ये आपल्या अभिनय आणि तंत्रज्ञान यामध्ये उत्तम काम करत महाविद्यालयाने हे यश संपादन केले आहे.
या शॉर्ट फिल्मचे लेखन व दिग्दर्शन शैलेश इंगळे यांनी केले होते. तसेच सिनेमॅटोग्राफर ओम पाडाळकर, एडिटिंग आणि विशेष मार्गदर्शन नंदकिशोर जुवेकर, कास्टिंग दिग्दर्शक डॉ. आनंद आंबेकर, पटकथा शुभम शिवलकर, ध्वनी आणि संगीत शैलेश इंगळे, सहाय्यक दिग्दर्शक म्हणून यश सुर्वे आणि राज बोरकर, सहाय्यक सिनेमॅटोग्राफर अभिजित जोशी आणि आदित्य दशवंतराव, रंगभूषा नेहा शर्मा आणि सिध्दी कदम, वेशभूषा मिथिला नाखरेकर आणि अनुजा जोशी, संघ समनव्यक प्रो. शुभम पांचाळ, संघ व्यवस्थापक प्रसाद साळवी आणि शुभम नंदाणे यांनी काम केले.
या शॉर्ट फिल्मच्या निर्मितीसाठी दिग्दर्शक नंदकिशोर जुवेकर आणि मयूर दळी यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले. तसेच महाविद्यालयाचे १९९५ चे माजी विद्यार्थी व कोंकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी श्री. सचिन देसाई व रेल्वे प्रबंधक श्री. शेडगे यांचे विशेष सहाय्य लाभले. महाविद्यालयाचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे नेहमीच प्रोत्साहन असते, विशेष करून प्रसाद गवाणकर यांचे मार्गदर्शन सतत असते.
या शॉर्ट फिल्ममध्ये शुभम शिवलकर याने प्रमुख भूमिका साकारली होती. तसेच सम्यक हतखंबकर, नेहा शर्मा, शुभम नंदाणे, आर्या वंडकर, मिथिला नाखरेकर, अनुजा जोशी, सिध्दी कदम, सिद्धांत सरफरे, कौस्तुभ आंब्रे, सिध्दी गुरव, यश सूर्वे, अभिजित जोशी, राज बोरकर, आदित्य दशवंतराव यांनी इतर भूमिका साकारल्या. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले तसेच पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.