रत्नागिरी जिल्ह्यातील गोगटे जोगळेकर महाविद्यालय हे कायमच कोणत्या न कोणत्या तरी कामगिरीमुळे व प्रगतशील वाटचालीमुळे नावाजत असत. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाची हि परंपरा अखंडित राहून, आता या परंपरेमध्ये आणखी एक अमूल्य भर पडली आहे ती म्हणजे , भारतातील प्रसिद्ध अशा झी म्युझिक कंपनीच्या प्लॅटफॉर्मवर महाविद्यालयातील काही आजी-माजी विद्यार्थ्यांनी मिळून बनवलेल्या वक्रतुंड महाकाय या गीताचे लॉन्चिंग नुकतेच यशस्वीरीत्या पार पडले आहे.
या गीताचे प्रक्षेपण झी म्युझिक मराठीच्या ऑफिशियल पेज वर दिनांक ८ सप्टेंबर रोजी झाले असून सदर गीताचे संगीत दिग्दर्शन पंकज घाणेकर यांनी केले असून शैलेश इंगळे यांनी ते स्वरबद्ध केले आहे. त्याचप्रकारे गीताचे छायाचित्रण वेदांत सौंदलगेकर तर नृत्य व नृत्य दिग्दर्शन सिद्धि ओक हिने केले आहे. गाण्याचे संकलन मयूर दळी यांनी केले तसेच व्हिडिओचे दिग्दर्शन शैलेश इंगळे आणि वेदांत सौंदलकर यांनी केले. सिद्धांत सरफरे यांनी गाण्याचे प्रसिद्धी प्रमुख म्हणून कामगिरी उत्तमरीत्या निभावली आहे.
वक्रतुंड महाकायच्या दैदिप्यमान यशामुळे महाविद्यालयाच्या व्हर्चुअल परंपरेमध्ये मोलाची भर पडली असून सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. या व्हिडिओ साठी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. आनंद आंबेकर यांचे प्रमुख सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले आहे. सदर कार्यक्रमाच्या सादरीकरणासाठी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या संस्थेच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, प्रभारी प्राचार्य डॉ. कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. साखळकर, विज्ञान शाखेच्या उपप्राचार्य डॉ.अपर्णा कुलकर्णी यांनी उपस्थित राहून अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.