28.1 C
Ratnagiri
Wednesday, September 3, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeMaharashtraना. गोगावलेंनी घरी केली बगलामुखी देवीची अघोरी पूजा?

ना. गोगावलेंनी घरी केली बगलामुखी देवीची अघोरी पूजा?

असा आरोप व्हिडिओ व्हायरल करत वसंत मोरे यांनी केला आहे.

शिवसेना नेते ना. भरत गोगावले यांनी निवडणूक जिंकण्यासाठी घरी अघोरी पूजा केल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी केला होता. याबाबत एक व्हिडिओदखील त्यांनी शेअर केला आहे. त्यांच्या या आरोपांवर ना. गोगावले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘होय! मी पूजा केली होती हे खरे आहे. पण अघोरी वगैरे ती पूजा नव्हती. देवीला आवाज जाण्यासाठी एका भक्ताने करावयाची महाड-पोलादपूरचे आमदार आणि राज्याचे रोजगार हमी मंत्री ना. भरत गोगावले यांनी नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी उध्दव ठाकरेंच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे यांचा शिवसेनेत हस्तक्षेप होत होता, असा गंभीर आरोप केला आहे. या मुलाखतीनंतर राजकारण तापले असून दोन्ही शिवसेनेचे नेते आरोप-प्रत्यारोप करत आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्याचे ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी एक व्हिडीयोच शेअर करत खळबळ उडवून दिली आहे.

निवडणुकीपूर्वी पूजा – विधानसभा निवडणुकीपूर्वी १७ ऑक्टोबर २०२४ ला मध्यप्रदेशमधील उज्जैन येथे असलेल्या बागलामुखी देवीच्या मंदिरातून गोगावले यांनी ११ पुजाऱ्यांना आमंत्रित केले होते. या पुजाऱ्यांच्यामार्फत घरात मोठी अघोरी पूजा घालण्यात आली. तब्बल १५ लाख रुपये एका पूजेला लागतात असा आरोप व्हिडिओ व्हायरल करत वसंत मोरे यांनी केला आहे.

जोरजोरात ओरडत केले होमहवन – यावेळी गोगावले यांनी मोठ्या आवाजात जणूकाही जोरजोरात ओरडत होमामध्ये आहुती टाकत असल्याचे मोरेंचे म्हणणे आहे. जोरजोरात होमात ते नेमके काय टाकत होते, हा अघोरी पूजेचा घाट त्यांनी का घातला? असा सवालही त्यांनी केला आहे. निवडणूक जिंकण्यासाठी ही अघोरी पूजा तर केली नाही ना? असा सवाल व्हिडिओ व्हायरल होताच काहींनी उपस्थित केला.

१५ लाख मोजले – या पूजेसाठी उज्जैन येथील बागलामुखी मंदिरातील ११ महाराजांना बोलावण्यात आले होते. तसेच त्या ११ महाराजांची पूजादेखील गोगावले यांनी केली असल्याचा आरोप वसंत मोरे यांनी केला आहे. त्यासाठी १५ लाख रूपये मोजल्याचे मोरे यांनी म्हटले आहे. तुमचा तुमच्या कामावर विश्वास नाही का? विश्वास असेल तर अशा अघोरी पूजा का केली? असा सवालदेखील यावेळी वसंत मोरे यांनी उपस्थित केला आहे. पुढे वसंत मोरे म्हणाले, अघोरी पूजा करण्यासाठी ‘ओम फट स्वाहा’ जे करतात त्यांना आणले जाते. महाराष्ट्रातले अनेक नेते तिथे जातात तब्बल १५ लाख रुपये एका पूजेला लागतात असा, आरोपसुद्धा वसंत मोरे यांनी केला आहे. दरम्यान ना. भरत गोगावले यांनी जी बागलामुखीची पूजा केली, ती अघोरी दिसत नाही, असा दावा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular