26.6 C
Ratnagiri
Monday, November 4, 2024

OnePlus चा सर्वात शक्तिशाली फोन 24GB RAM आणि 1TB स्टोरेजसह लॉन्च …

चीनी टेक कंपनी OnePlus च्या नवीन फ्लॅगशिप...

भारतीय फलंदाजी पुन्हा अडचणीत, दहा मिनिटांत भारताची पडझड

बंगळूर आणि पुणे कसोटीत भारतीय संघाच्या पराभवात...
HomeRatnagiriगोळपला माकडांची होणार धरपकड, वनखात्याच्या प्रस्तावाला मान्यता

गोळपला माकडांची होणार धरपकड, वनखात्याच्या प्रस्तावाला मान्यता

प्रायोगिक तत्त्वावर तालुक्यासाठी लागणारा निधी प्राप्त झाला आहे.

जिल्ह्यात वानर, माकडांच्या बंदोबस्तासाठी जिल्हा नियोजन समितीकडून वनखात्याने केलेल्या २२ लाखांच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. १५ दिवसांत गोळपमधून वानर, माकडांच्या धरपकड मोहिमेला सुरुवात केली जाणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. वनखात्याकडून प्राप्त माहितीनुसार, वन्यजीव व्यवस्थापन निसर्ग संरक्षण या योजनेंतर्गत २२ लाखांचा हा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीला सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला संपूर्ण जिल्ह्याचा विचार करण्यात आला आहे. या प्रस्तावाला पालकमंत्री उदय सामंत व जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या पुढाकाराने जिल्हा नियोजन समितीकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

प्रायोगिक तत्त्वावर तालुक्यासाठी लागणारा निधी प्राप्त झाला आहे. मोहिमेची सुरुवात गोळपमधून होईल. यासाठी आवश्यक निधी व सामग्री रत्नागिरी परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश सुतार यांच्याकडे वर्ग करण्यात आला असून, रत्नागिरी तालुक्यात वानर, माकडांना पिंजऱ्यात पकडण्यासाठी ८ पिंजरे व त्यांना पकडून अभयारण्यात सोडण्यासाठी एक वाहनही उपलब्ध होणार आहे. ही प्रक्रिया पार पडल्यावर पुढील १५ दिवसांत वानर, माकड पकडण्याच्या मोहिमेला सुरुवात होईल. तालुक्यातील मोहीम फत्ते झाल्यावर त्याचा अभ्यास करून जिल्ह्यासाठी लागणारा निधी देण्याचे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी अविनाश काळेंना दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीला नुकसानकारक ठरलेली वानर, माकडे पकडून अभयारण्यात सोडण्यात येणार आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular