27.9 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

कुंभार्ली घाटाचे सोनपात्र घाट असे नामांतर करण्याची सकल धनगर समाजाची मागणी

सोनबा धनगर बांधवाची आठवण सदैव टिकवून ठेवण्यासाठी...

‘अनारक्षित मेमू रेल्वे’ बाबत नाराजी कोकण विकास समिती

गणेशोत्सवासाठी मध्यरेल्वेने जाहीर केलेल्या दिवा चिपळूण आणि...

दाभिळ, उन्हवरे, पानवळेत बीएसएनएलचे ‘नो नेटवर्क’

दापोली तालुक्यातील गावतळे बाजारपेठेसह उन्हवरे, दाभिळ, पावनळ...
HomeEntertainmentसोनेरी दुनियेतील, सुनहरी आवाजातील गायक बप्पी लहीरींचे निधन

सोनेरी दुनियेतील, सुनहरी आवाजातील गायक बप्पी लहीरींचे निधन

अनोखी गाण्याची शैली गाणी आणि सोन्याच्या दागिन्यांची आवड हि त्यांची खासियत होती.

प्रसिद्ध गायक बप्पी लहरी यांचे आज सकाळी उपचारादरम्यान रुग्णालयात निधन झाले. वयाच्या ६९ व्या वर्षी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठिक नव्हती आणि रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. बप्पी लहरी यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. अनोखी गाण्याची शैली गाणी आणि सोन्याच्या दागिन्यांची आवड हि त्यांची खासियत होती.

२७ नोव्हेंबर १९५२ रोजी कोलकाता येथे त्यांचा जन्म झाला. बप्पी लहरी यांचा लहानपणापासूनच संगीताची आवड होती. वयाच्या अवघ्या तिसर्‍या वर्षापासून ते तबला वाजवायला शिकले होते. बप्पी दा यांना डिस्को गाण्यांचा बादशाह असे म्हटले जात असे.

बप्पी लहरींचे खरे नाव आलोकेश लहरी असे होते. परंतु, फिल्म इंडस्ट्रीमध्ये डिस्को म्यूझिकचा ट्रेंड आणण्याचे संपूर्ण श्रेय केवळ त्यांनाच दिले जाते. विविध प्रकारच्या डिस्को म्युझिकसोबतच, अंगावर भरपूर प्रमाणात सोने घालणे आणि नेहमी डोळ्यावर गॉगल्स चढवणे अशा प्रकारचा बप्पी लहरी यांचा पेहराव असायचा.

बप्पी दा यांनी त्यांच्या एका जुन्या मुलाखतीमध्ये त्यांना सोन्याचे दागिने घालायची आवड कशी निर्माण झाली याबाबत खुलासा केला होता. त्यांनी सांगितले कि, हॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक आणि अभिनेता एल्विस प्रेसली हा माझा सर्वात आवडता कलाकार असून, तो कायम सोन्याची चेन घालतो. त्याला पाहून मला सुद्धा प्रेरणा मिळत गेली.

इतकेच नव्हे तर,  जर मी भविष्यात यशस्वी झालो तर, माझी स्वत:ची अशी एक स्वतंत्र ओळख निर्माण करेन असे त्यांनी ठरविले होते. त्यातूनच त्यांना असे वाटत गेले की, सोनं त्यांच्यासाठी लकी आहे. त्यामुळेच मी कायम सोनं घालतो आणि त्यामुळेच गाण्यासोबत माझी हि गोल्डन लहरी म्हणून वेगळी ओळखही निर्माण झाली आहे. बप्पीदा यांनी आपल्या घरात हिट गाण्याच्या आठवणीत गोल्ड प्लेटेड डिस्क लावली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular