रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवरील खेळपट्टी आणि मैदानाच्या दुरावस्थेबाबत आजी – माजी क्रिकेटपटू तसेच हितचिंतकांची स्टेडियमवर बैठक आयोजित करण्यात आली होती. रत्नागिरीमधून विविध खेळांमधून अनेक निष्टावंत खेळाडू उदयास यावेत यासाठी, सतत अनेक स्तरावर प्रयत्न सुरु असतात. क्रिकेट खेळा विषयी स्पेशल आस्था, प्रेम आणि आपुलकी असणाऱ्या रत्नागिरीकरांनी तसेच रत्नागिरीमध्ये क्रिकेट खेळाडूच्या संख्येत वाढ होण्यासाठी सकारात्मक विचार करणाऱ्यांनी सदर बैठकीला उपस्थित रहाण्याचे आवाहन करण्यात आले होते.
तालुक्यातील मारुती मंदिर परिसरामध्ये छत्रपती शिवाजी स्टेडियममधील विविध सुधारणा करण्याच्या कामांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. अनेक वर्षापासून अनेक खेळांसाठी वापरण्यात येणाऱ्या या स्टेडियमची काही प्रमाणात डागडुजी करण्याची आवश्यकता आहे. हि गरज लक्षात घेऊन, रत्नागिरीमधील क्रीडाप्रेमींची नाम. उदय सामंत यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. खेळाडूंना सामोरे जावे लागणाऱ्या अनेक समस्यांवर तिथे चर्चा करण्यात आली, त्याचप्रमाणे मैदानामध्ये वाढलेले गावात, कुत्रे, जनावरे, गुरे यांचा सर्हास वावर तेथे पहायला मिळतो, त्या गोष्टींवर कुठेतरी नियंत्रण मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी सुरक्षारक्षक नेमणे गरजेचे आहे.
नाम. सामंत यांनी सर्व समस्या ऐकून घेतल्यावर, क्रीडांगणाचा दर्जा सुधारण्यासाठी मैदानावर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागणार असल्याचे म्हटले. त्यामध्ये चांगल्या दर्जाची खेळपट्टी, त्यातील तज्ञ बोलावून तयार करण्यात येईल. त्याचप्रमाणे, योग्य त्या सुविधा खेळाडूला मिळाल्या कि, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जावर त्यांची कामगिरी उत्कृष्ट राहील. पण मैदानाच्या देखभालीचा खर्च मोठा असल्याने, पालिकेच्या अर्थसंकल्पामधून २ कोटी ४५ लाख रुपये वाढीव तरतूद करून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन नाम. सामंत यांनी दिले.