25.9 C
Ratnagiri
Sunday, September 24, 2023
HomeRatnagiriजिल्हा रुग्णालयात मोफत उपचाराची शासनाची घोषणा पण पुरेसे उपचार साहित्यच उपलब्ध नाही

जिल्हा रुग्णालयात मोफत उपचाराची शासनाची घोषणा पण पुरेसे उपचार साहित्यच उपलब्ध नाही

हापकीन इन्स्टिट्यूट बंद झाल्यानंतर औषध पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे.

शासकीय रुग्णालयात वैद्यकीय रत्नागिरी, २२ ऑगस्ट (किशोर सेवा मोफत देण्याची घोषणा नुकतीच राज्य शासनाने केली आहे. मात्र त्याच वेळी शासनाकडून जिल्हा रुग्णालयाला पुरेसा औषध साठा तसेच वैद्यकीय उपकरणे प्राप्त होत नसल्याने रुग्णसेवेत मोठ्या अडचणी येत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी १५ ऑगस्टपासून शासकीय रुग्णालयात मोफत उपचाराची घोषणा केली. राज्यभर अंमलबजावणी सुरूही झाली. पण दुसरीकडे जिल्ह्याच्या शासकीय रुग्णालयात औषधांचा पुरेसा साठा नसल्याचे दिसत आहे. डायलेसिसच्या रुग्णांना आवश्यक असणाऱ्या डायलिझरचा तुटवडा जाणवत आहे.

दरवर्षी ६ हजार डायलिझरची गरज असते. म्हणजे महिन्याला हिन्याला ५०० डायलिझर लागतात. एकदा वापरल्यावर ते पुन्हा वापरता येत नाहीत. चालू वर्षात डायलिझरचा पुरेसा पुरवठा झालेला नाही. प्रशासनाला हे उपकरण उपलब्ध करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. आरोग्य विभागाने जिल्हा नियोजन समितीमध्ये तरतूद केलेल्या निधीपैकी ७० टक्के निधी शासनाने साठवण केलेल्या प्राधिकरणाकडे पाठविण्याचा निर्णय घेतल्याने आर्थिक अडचणी अधिकच वाढल्या आहेत. एक कोटी रुपयांचा निधी आवश्यक असताना जेमतेम १० लाख रुपये देण्यात आले आहेत. या विभागासह अन्य विभाग चालवायचे तरी कसे असा प्रशासनासम  प्रश्न आहे.

हापकीन इन्स्टिट्यूट बंद झाल्यानंतर औषध पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. ६०० प्रकारच्या औषधे व इतर सामुग्रीपैकी जेमतेम ५० ते ६० प्रकारची औषधे व अन्य साहित्य रुग्णालयला प्राप्त झाले आहे. एप्रिलपासून तर जिल्हा रुग्णालयाला शासनाकडून औषधे किंवा डायलेसिससाठीचे साहित्य पुरवले गेलेलेच नाही. सध्या रुग्णालयाकडे केवळ ३५० डायलिंझर शिल्लक आहेत. त्यामुळे ते संपल्यावर करायचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, या संदर्भात रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांना विचारणा केली असता लवकरच या संदर्भात मार्ग काढण्याचा प्रयत्न आपण करु. रुग्णांची गैरसोय होऊ देणार नाही, असे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular