लोटे परशुराम येथील श्री. संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तीधाम सेवा संस्थानच्या गोशाळा संदर्भातील विविध मागण्यासाठी चार वेळा उपोषण केले. तत्कालीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. परंतू अद्याप त्यावर तोडगा निघालेला नाही. गोशाळेतील ११०० गायींच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. शासकीय तसेच खासगी मदत देखील मिळत नसल्याने गोशाळेवरील आर्थिक ताण भार वाढतोच आहे. त्यामुळे रखडलेल्या मागण्यांसाठी १७ मार्चपासून गोशाळेत आमरण उपोषण सुरू करणार असल्याची माहिती ह.भ.प भगवान कोकरे महाराज यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. कोकरे महाराज म्हणाले, महाराष्ट्रात गाईला राज्यमातेचा दर्जा असताना लाखो गाईंच वाहतूक करून कत्तल केली जाते. त्यावर ठोस उपाययोजना कराव्यात. राज्यात प्रतिगोवंश ५० रूपये अनुदान गोशाळांना द्यावे, लोटे परशुराम येथील श्री. संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तीधाम सेवा संस्थानच्या गोशाळेतील ११०० गायींचा प्रश्न २ वर्षापुर्वी केलेल्या उपोषणात सोडवण्याचे आश्वासन मिळाले होते.
मात्र अद्याप त्यावर निर्णय नाही. गोशाळेचे मंजूर २५ लाखाचे अनुदान तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देण्याची शिफारस केली असतानाही ते मिळालेले नाही. गोशाळेला व्यावसायीक दरानेच विजपुरवठा होत आहे. तो शेतीप्रमाणे आकारण्यात यावा. परिपोषण योजनेत देशी गायीला स्थान मिळाले, परतू बैलाला स्थान नसल्याने त्याची वाहतूक करून कत्तल केली जाते. गोवंश हत्या बंदी कायद्यात बैलाला स्थान आहे, मात्र बैलाला अनुदान नसल्याने त्याचा साभांळ करणे गाशाळेला कठीण जाते. त्याकरिता बैलाला देखील अनुदान मिळाल्यास त्यांची होणारी कत्तल थांबेल. गाशाळेतून कसल्याही प्रकारचे उत्पन्न नाही. ११०० गायींसाठी दररोज ८० हजाराचा खर्च आहे. खर्चाचा ताळमेळ जुळत नसल्याने गाशाळेवर ५० लाखाच्या कर्जाचा डोंगर आहे.
यातून गायी वाचणार कशा, गायींसाठी कोकणच्या धर्तीवर चारा उपलब्ध होत नाही. रोज सुमारे ७ टन ओला व सुका चारा द्यावा लागतो. किर्तनसेवेच्या मिळणाऱ्या सेवा शुल्कातून हा खर्च भागत नाही. राज्य सरकारने गायीला राज्यमातेच दर्जा दिला. सरकारी अनुदान मिळतेय म्हणून दातेही पुढाकार घेत नाही. मात्र प्रत्यक्षात अनुदानाचा पत्ता नाही. या सर्व बाबी आमच्या आर्थिक ताकदीच्या पलिकडच्या आहेत. त्यामुळे शासनाचेच याकामी पुढाकार घ्यायला हवा. अन्यथा आमच्या सारख्या वारकरी सांप्रदायिक गोपालकास कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहिला नंसल्याने कोकरे महाजारांनी नमुद केले. या मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी लोटे परशुराम येथील गोशाळेत १७ मार्चपासून आमरण उपोषण करणार असल्याचे सांगितले. याचे निवेदनही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तसेच पशुसंवर्धन आयुक्तांना दिले आहे.