26 C
Ratnagiri
Saturday, November 22, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeMaharashtraअमित ठाकरे यांचे शिवसेनेवर टीकास्त्र, सरकारमध्ये काम करण्याची इच्छाशक्तीच दिसत नाही

अमित ठाकरे यांचे शिवसेनेवर टीकास्त्र, सरकारमध्ये काम करण्याची इच्छाशक्तीच दिसत नाही

मुंबईमध्ये सध्या काही महिन्यांवर आलेल्या महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांकडून मोर्चेबांधणी केली जात असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी आज शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

कायमच वेगवेगळ्या मुद्द्यांवरून शिवसेनेला लक्ष्य केलं जात असते, त्यामध्ये आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा देखील शिवसेनेच्या विरोधात टीका करण्यात समावेश झाला आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे हे गेल्या काही दिवसांमध्ये राजकारणात सक्रिय झाले असून, आता त्यांनी थेट शिवसेनेवर निशाणा साधला आहे. सरकारमध्ये काम करण्याची इच्छाशक्तीच दिसून येत नाही,  अशी अप्रत्यक्ष टीका अमित ठाकरे यांनी केली आहे.

आज मनसेकडून अमित ठाकरे यांच्या पुढाकाराने राज्यातील एकूण ४० समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. यासंदर्भात अमित ठाकरे यांनी जनतेला आवाहन करून मोहिमेत सहभागी होण्याची देखील विनंती देखील केली होती. मुंबई महानगर पालिकेमध्ये गेल्या २५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या शिवसेनेवर निशाणा साधला आहे. “समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटनाच्या बाबतीत कसं काम होणार? किनारे बघितले तर लक्षात येईल. सरकारकडे जबाबदारी देऊन आपण बघितलंय काय होतं ते ”, असं ते म्हणाले.

त्यांच्याकडे महानगरपालिका गेली २५ वर्ष आहे. त्यांनी यंत्रणा व्यवस्थित राबवली असती, तर दुसऱ्या कुणालाही लाभलेल्या समुद्रकिनार्यांची साफसफाई करण्याची गरज लागली नसती. आधी तुमच्या शहरांवर, राज्यावर तुम्हाला प्रेम असायला हवं. कुणी सांगून ते निर्माण होत नाही”, . आपला समुद्रकिनारा आहे. आपणच साफ ठेवायला हवा. कारण सरकारकडून अपेक्षा ठेवून चालणार नाही. असं देखील अमित ठाकरे म्हणाले.

RELATED ARTICLES

Most Popular