26.6 C
Ratnagiri
Thursday, July 3, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeRatnagiriमतदान प्रक्रियेतील वाहनांना जीपीएस यंत्रणा, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह

मतदान प्रक्रियेतील वाहनांना जीपीएस यंत्रणा, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह

२२५ एसटी गाड्या, ३१० मिनीबस, बोलेरो तर १५ कार्गो गाड्यांचा समावेश आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यांतील मतदानासाठी निवडणूक विभाग सज्ज आहे. मतदारसंघात एक हजार ९४२ मतदान केंद्रांवर मंगळवारी (ता. ७) मतदान होणार आहे. त्यासाठी केंद्रांच्या १४० टक्के इलेक्ट्रॉनिक मतपेट्या ५५० वाहनांद्वारे केंद्रावर पाठवण्यात आल्या आहेत. या वाहनांना जीपीएस यंत्रणा बसवली असून, त्यांचा रूट (मार्ग) निश्चित आहे. शांततेत आणि जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी प्रयत्न आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकरण पुजार, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, आदी उपस्थित होते. सिंह म्हणाले, मतदारसंघात १११ मतदान केंद्रे आहेत. या केंद्रांवर बुरखा घातलेल्या महिलांची तपासणी करून मतदान करून घेतले जाणार आहे. ऑल महिला मतदान केंद्र या मतदान केंद्रावर सर्व अधिकारी, कर्मचारी महिला असणार आहेत. ही ७ केंद्रे आहेत. ऑल दिव्यांग केंद्रे सात असून, यामध्येही सर्व अधिकारी, कर्मचारी दिव्यांग असणार आहेत.

ऑल युथ मतदान केंद्र सात असून, त्यामध्ये २२ ते ३० या दरम्यानच्या युवा अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे तसेच आदर्श मतदान केंद्र चार असून ती चिपळूण, राजापूर आणि कुडाळमध्ये दोन अशी चार असणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथून आज सर्व केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक मशीन पाठविल्या. त्यासाठी ५५० वाहने घेण्यात आली आहेत. यामध्ये २२५ एसटी गाड्या, ३१० मिनीबस, बोलेरो तर १५ कार्गो गाड्यांचा समावेश आहे. या गाड्यांना जीपीएस यंत्रणा बसवण्यात आली आहे. तसेच त्यांचा मार्ग निश्चित केला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या कामासाठी घेण्यात आलेल्या वाहनांवर निवडणूक विभागाचे विशेष लक्ष असणार आहे, अशी माहिती सिंह यांनी दिली.

RELATED ARTICLES

Most Popular