29.9 C
Ratnagiri
Wednesday, March 12, 2025

देवरहाटीच्या जमिनी परत करा ! रत्नागिरीमध्ये घंटानाद आंदोलन

देवरहाटीच्या जमिनी शासनाने हस्तगत केल्या आहेत. त्या...

दापोलीमधील वाहतुकीची गती मंदावली…

येथील एसटी बसस्थानक ते बुरोंडीनाका या परिसरातील...

‘बसरा स्टार’साठी बंधारा कमी करणार

निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून भरकटत मिऱ्या किनाऱ्यावर...
HomeRatnagiriछत्रपती संभाजीराजेंचे भव्य स्मारक व्हावे - प्रमोद जठार

छत्रपती संभाजीराजेंचे भव्य स्मारक व्हावे – प्रमोद जठार

५० एकरांमध्ये भव्य स्मारक व्हावे, अशी शपथ घेणार आहोत.

संभाजी महाराजांनी ११ मार्च १६८९ मध्ये बलिदान दिले. मंगळवारी (ता. ११) महाराजांचा बलिदान दिवस आहे. त्यांना कसबा (ता. संगमेश्वर) येथे एकत्र येऊन स्मरण करतो वंदन करतो. या धर्मरक्षकाची शपथ घेऊन महाआरती होते. सर्व लोकप्रतिनिधी आणि शिवप्रेमींची मागणी आहे की, या ठिकाणी स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईज म्हणजे त्यागाचे सर्वोच्च प्रतीक म्हणजे संभाजी महाराज आहेत. त्यांचे ५० एकरांमध्ये भव्य स्मारक व्हावे, अशी शपथ घेणार आहोत, अशी माहिती भापचे नेते प्रमोद जठार यांनी दिली. शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत ते म्हणाले, उद्या सकाळी १० वाजता संगमेश्वर हायवेपासून कसब्यापर्यंत महाराजांच्या पुतळ्यापर्यंत रॅलीने जाऊ. तिथे त्यांना वंदन करून महाआरती होते. त्यांच्या केलेल्या कामाचे स्मरण होते. या कार्यक्रमाला उद्योगमंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत, मंत्री नितेश राणे, आमदार शेखर निकम, आमदार नीलेश राणे, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, आमदार भैया ऊर्फ किरण सामंत आदी मंडळी उपस्थित राहणार आहेत.

या निमित्ताने मला सांगायचे आहे की, स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईट म्हणजे त्यागाचे सर्वोच्च प्रतीक म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आहेत. त्यांचे थोड्या थोडक्या नाही, तर ५० एकरांमध्ये स्मारक व्हावे, यासाठी आम्ही तिथे शपथ घेणार आहोत. यापूर्वीच मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक कसब्यात होणार असल्याचे घोषित केले आहे. अर्थमंत्री अजित पवारदेखील या स्मारकासाठी भरीव निधी देतील, असा विश्वास व्यक्त करून सर्व शिवप्रेमींनी सकाळी १० वाजता संगमेश्वरला यावे, असे आवाहन जठार यांनी केले.

कसबावासीयांकडून स्वागत – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कसबा संगमेश्वर येथे ज्या वाड्यात वास्तव्यासाठी होते, तो सरदेसाई यांचा वाडा छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक म्हणून घोषित केला आहे. याबाबतची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली. याबाबत सुभाष सरदेसाई यांनी सरदेसाई वाड्यावर स्मारक उभारण्यासाठी आम्ही पूर्ण सहकार्य करू. सरकारने आम्हाला विश्वासात घेऊन स्मारकाची ब्ल्यू प्रिंट दाखवावी, अशी भूमिका व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular