तामिळनाडूतील कुन्नूर येथे झालेल्या हेलिकॉप्टर अपघातामध्ये सीडीएस जनरल बिपिन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्यासह १३ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे निधन झाले. यावेळी त्यातील एकमेव अधिकारी ग्रुप कॅप्टन वरुण सिंह हे बचावले होते. त्यांच्यावर त्वरित उपचार करण्यात आले. मात्र, काल उपचारा दरम्यान त्यांचे दुख:द निधन झाल्याची बातमी समोर आली आहे.
यंदाच्या स्वातंत्र्यदिनी त्यांना ‘शौर्य चक्र’ प्रदान करण्यात आले होते. हेलिकॉप्टर दुर्घटनेत जखमी झाल्यानंतर त्यांच्यावर बंगळुरु येथील कमांड रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. या दुर्घटनेत बिपिन रावत यांच्यासह इतर १३ जणांचे निधन झाले. यावेळी एवढ्या मोठ्या दुर्घटनेतून वाचलेले वरुण सिंह यांच्यावर उपचार सुरु असताना, उपचारादरम्यान बुधवारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुले आहेत.
लष्कराने त्या गावातील लोकांनी वेळेवर पोहचून अपघातग्रस्तांना वाचविण्यात मदत केल्याने लोकांचे आभार मानले आहे. भारतीय लष्कराने तामिळनाडूच्या या ग्रामस्थांचे आभार मानत त्यांना मदत करण्याचेही ठरवले आहे. लष्कराने म्हटले आहे की, “तुमच्यापैकी अनेकांनी मदत केली. गावकऱ्यांच्या मदतीशिवाय १४ लोकांना वेळेमध्ये रुग्णालयात पोहोचवता येणे शक्य नव्हते.
या १४ जणांपैकी एक हवाई दलाचा अधिकारी अजूनही जिवंत आहे आणि ते बेंगळुरूचे असून, ते हॉस्पिटलमध्ये जीवन आणि मृत्यूशी झुंज देत आहे. जर ते जिवंत आहेत तर त्याचे कारण केवळ तुम्ही आहात, तुम्ही या १४ लोकांसाठी देवासारखे धावून आला आहात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार” असेही भारतीय सैन्याने म्हटले आहे. त्याचप्रमाणे लष्कराने तामिळनाडूच्या या ग्रामस्थांचे आभार मानून त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचेही आवाहन दिले आहे.