23.5 C
Ratnagiri
Friday, November 28, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeSportsSRH च्या फलंदाजांना सूर गवसणार की GT सलग तिसरा विजय नोंदवणार...

SRH च्या फलंदाजांना सूर गवसणार की GT सलग तिसरा विजय नोंदवणार…

हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

आयपीएलमध्ये रविवारी सनराइजर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होणार आहे. आतापर्यंत हैदराबादने चार, तर गुजरातने तीन सामने खेळले आहेत. यापैकी हैदराबादला तीन, तर गुजरातला एका सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. गुणतक्त्यातही हैदराबादचा संघ सर्वात खालच्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत आजचा सामना जिंकून विजयी लय परत मिळवण्याचा हैदराबादच्या संघाचा प्रयत्न असेल. हैदराबादकडे विस्फोटक फलंदाजांची मोठी फळी आहे. मात्र, पहिला सामना वगळता त्यांना प्रभावी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. गेल्या तीन सामन्यांत संघाला अनुक्रमे १९०, १६३ आणि १२० धावाच करता आल्या, त्यामुळे त्यांच्यावर सलग तीन पराभवांची नामुष्की ओढवली आहे.

गोलंदाजीमध्येही हैदराबादचा संघ अपयशी ठरला आहे. नवोदित लेगस्पिनर झीशान अन्सारीला (४ विकेट्स, इकॉनॉमी ९.७५) अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. तर पैट कमिन्सची इकॉनॉमी १२.३० इतकी आहे. त्यामुळे या सामन्यात फलंदाजांबरोबरच गोलंदाजांकडूनही चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा आहे. दुसरीकडे, गुजरातच्या संघाने आतापर्यंत तीन सामने खेळले असून, त्यापैकी सलग दोन सामन्यांत त्यांना विजय मिळाला आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. अशा परिस्थितीत आजचा सामना जिंकून विजयी लय कायम ठेवण्याचा गुजरात टायटन्सचा प्रयत्न असेल. आयपीएलमध्ये दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत चार सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी तीन सामने गुजरातने, तर एक सामना हैदराबादने जिंकला आहे. दरम्यान, यंदाच्या हंगामातील गुजरातच्या संघाचा फॉर्म पाहता या सामन्यात गुजरातचे पारडे जड दिसते.

पिच रिपोर्ट – हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. संध्याकाळी ७:३० वाजता या सामन्याला सुरुवात होईल. हैदराबादची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल आहे. या मैदानावरील सरासरी धावसंख्या १८१ आहे. या मैदानावर पहिल्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाने ४६ टक्के सामने जिंकले आहेत. या खेळपट्टीवर सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना मदत मिळते, तसेच मधल्या षटकांत फिरकीपटूंनाही थोडी मदत मिळते. रात्री या मैदानावर दव पडत असल्याने नाणेफेक महत्त्वाची ठरणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular