26.1 C
Ratnagiri
Saturday, February 21, 2026

शीळ धरणातून जॅकवेलमध्ये पाणी येण्यासाठीच्या पाईपलाईनचे काम पूर्ण

नैसर्गिक उताराने शीळ धरणातून जॅकवेलमध्ये पाणी येण्यासाठी...

नको शेलू नको वांगणी’ गिरणी कामगारांना घर मुंबईतच हवे

नको शेलू नको वांगणी गिरणी कामगारांना घर...

अजितदादांच्या विमानाचा अपघात कसा झाला? प्राथमिक अहवालात धक्कादायक माहिती समोर

अजित पवार यांना बारामतीला घेवून गेलेल्या विमानामध्ये...
HomeRatnagiriआधी ठेकेदारांकडून पैसे घेणे थांबवावे! पालकमंत्री सामंतांनी लगावला टोला

आधी ठेकेदारांकडून पैसे घेणे थांबवावे! पालकमंत्री सामंतांनी लगावला टोला

पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.

काहीजण म्हणतात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मी मंत्री बनणार आणि मंत्री झाल्यावर ठेकेदारांना सोडणार नाही, पण ठेकेदारांवर बोलणाऱ्यांनी आणि आम्हाला सल्ले देणाऱ्यांनी प्रथम ठेकेदारांकडून पैसे घेणे थांबविले पाहिजे अशा शब्दात पालकमंत्री उदय सामंत यांनी कोणाचेही नाव न घेता टीकास्त्र सोडले. लांजा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील विविध विकास कामांच्या भूमिपूजन आणि उद्घाटनाचा कार्यक्रम मंगळवारी ८ ऑक्टोबर रोजी पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.

शहरातील कुक्कुटपालन कुंभारवाडी येथील शिवपार्वती हॉल या ठिकाणी झालेल्या या दहा महिन्यात काय झाले, कोणकोणती विकास कामे दहा महिन्यात पूर्ण झाली हे देखील नागरिकांनी लक्षात घेतले पाहिजे, लांजा ग्रामीण रुग्णालय, ओणी येथील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांची दहा वर्षांची कामे का रखडली? जी व्यक्ती तुमच्यासाठी झटते, तुमच्या अडीअडचणींना धावून जाते अशा व्यक्तीलाच भविष्यात विधानसभेत पाठवा अशा शब्दात त्यांनी एक प्रकारे किरण सामंत यांना विधानसभेत पाठविण्याचा मनसुबा बोलून दाखवला.

RELATED ARTICLES

Most Popular