23.7 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriपर्यटन विकासातून रोजगारनिर्मिती करण्यासाठी पालकमंत्री म्हणून मी प्रयत्न करेन

पर्यटन विकासातून रोजगारनिर्मिती करण्यासाठी पालकमंत्री म्हणून मी प्रयत्न करेन

पर्यटक कोकणाकडे जास्तीत जास्त आकर्षित होण्यासाठी आणि पर्यटनातून स्थानिकांना रोजगार मिळणे गरजेचे आहे.

जागतिक पर्यटन दिनानिमित्त रत्नागिरी तालुक्यातील अल्पबचत सभागृहात जिल्हा उद्योग केंद्र आणि रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्था तसेच कोकण पर्यटन उद्योग संघ यांनी एकत्रित रित्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी दुरदृश्य प्रणाली द्वारे सामंत यांनी संबंधिताना मार्गदर्शन केले.

त्यावेळी बोलताना ते म्हणाले कि, कोकण हा पर्यटनाचा प्रमुख गाभा आहे. पर्यटक कोकणाकडे जास्तीत जास्त आकर्षित होण्यासाठी आणि पर्यटनातून स्थानिकांना रोजगार मिळणे गरजेचे आहे. निव्वळ याच निस्वार्थी भूमिकेतून सर्वांनी एकत्रितपणे येऊन कार्य करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले आहे.

दूरदृश्य प्रणाली द्वारे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपल्या मार्गदर्शनात संबोधित करताना सांगितले कोकणात आंबा, काजू, फणस,विविध प्रकारचे मासे, कोकणची विशिष्ट खाद्यसंस्कृती, उद्योग सातासमुद्रापार गेले पाहिजे आणि पर्यटक आपल्याकडे स्वतःहून त्याची मागणी घेऊन आले पाहिजेत. यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करणे आवश्यक आहे. मुख्य म्हणजे पर्यटन विकासातून रोजगारनिर्मिती व्हायला हवी, याकरीता पालकमंत्री म्हणून आवश्यक ते सर्व प्रयत्न मी करेन असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. बी एन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. निसर्ग संरक्षण करतानाच सोयीसुविधा दिल्या तर पर्यटनाचा आनंद द्विगुणित होईल व हे शाश्वत पर्यटन होईल, याकडे लक्ष दिले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी यावेळी मार्गदर्शनात केले. जिल्ह्यात कृषी पर्यटन, साहसी खेळ, खाडी पर्यटन, सह्याद्री, कातळशिल्प आणि समुद्रकिनारे या सर्वच ठिकाणी पर्यटनाला मोठा वाव आहे. तो वाढविण्यासाठी येथील स्थानिकानी अधिक पुढाकार घेतला पाहिजे. हॉटेल असोसिएशन, पर्यटन विषयक संस्था या सर्वांनी एकत्र येऊन सांघिक प्रयत्न करण्याची गरज आहे. झिपलाइन, फेरीबोट पर्यटन यासह विविध प्रकारचे पर्यटनाचे चारशे प्रस्ताव जिल्हा उद्योग केंद्राकडे आले आहेत असे त्यांनी सांगितले. दिवसभर चाललेल्या या महोत्सवामध्ये पर्यटन विषयक माहितीसत्र, चर्चासत्र, परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular