28.7 C
Ratnagiri
Thursday, May 16, 2024

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गोविंदाने स्टेजवर केला डान्स

2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी गोविंदा पुन्हा राजकारणात...

मतदान प्रक्रियेसाठी एसटी बसेस आरक्षित झाल्याने प्रवाशांचे नियोजन फिस्कटले…

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील येथील एसटी आगाराच्या...

उपासमारीची वेळ पाणलोट सचिवांचा आंदोलन छेडण्याचा इशारा…

प्रधानमंत्री कृषी सिंचन पाणलोट विकास योजनेअंतर्गत गेल्या...
HomeRatnagiriगुहागर मधील महिलेचा अपघाती मृत्यू

गुहागर मधील महिलेचा अपघाती मृत्यू

कचरा काढताना त्या नकळत शौचालयाच्या टाकीवर गेल्या त्याचवेळी टाकीवरील कडाप्पा तूटला आणि मनाली तोल जावून शौचालयाच्या टाकीत पडल्या.

गुहागर तालुक्यातील वरवेली आगरेवाडी येथे मनाली विजय भागडे,  कडाप्पा तुटल्याने शौचालयाच्या टाकीत पडल्या. त्यावेळी डोक्याला गंभीर इजा झाल्याने तिचा जागीच मृत्यू ओढवला. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. सौ. मनाली वरवेलीला आपल्या आजारी आईला भेटायला आल्या होत्या.

सौ. मनाली यांचे सासर – वहाळ ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथे असून त्या सध्या मुंबईत रहात होत्या. तिचे माहेर वरवेली आगरे वाडी असून माहेरचे नाव शुभांगी आगरे आहे. त्यांची आई गंभीर आजारी असून बरेच दिवस अंथरुणाला खिळून आहे. कोरोनामुळे प्रवास करणे सुद्धा कठीण बनले असल्याने, तिला भेटण्यासाठी सौ. मनाली भागडे दोन दिवसांपूर्वी माहेरी वरवेलीला आल्या होत्या.

त्यांच्या माहेरच्या घराच्या शेजारी शौचालयाच्या टाकी जवळ सौ. मनाली कचरा काढण्याचे काम करत होत्या, कचरा काढताना त्या नकळत शौचालयाच्या टाकीवर गेल्या त्याचवेळी टाकीवरील कडाप्पा तूटला आणि मनाली तोल जावून शौचालयाच्या टाकीत पडल्या. आगरे यांच्या घराशेजारी प्रेत झाल्याने अनेक गावातील मंडळी तेथे जमली होती.

शौचालयाच्या टाकीत कोणीतरी पडल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी तिकडे धाव घेतली आणि मनालीला बाहेर काढले. त्यावेळी त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून नाकातून रक्तस्त्राव होत होता. त्या बेशुद्ध झाल्याचे लक्षात आले. तातडीने ग्रामस्थांनी तिला डॉक्टरांकडे नेले. मात्र त्यामध्ये डॉक्टरांनी मनालीचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेची माहिती रविंद्र रामचंद्र आगरे वय ४६, रा. वरवेली यांनी गुहागर पोलीस ठाण्यात याची दिली आहे. अधिक तपास गुहागर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार आनंदराव पवार करित आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular