26.7 C
Ratnagiri
Sunday, July 6, 2025

मेरा ई-केवायसी अॅप टाळेल रेशनकार्ड रद्दची कारवाई

ई-केवायसी अपूर्ण असलेल्या जिल्ह्यातील ३ लाख ३...

तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी रत्नागिरीत बँक अधिकाऱ्यावर गुन्हा

'माझी मुलगी सुखप्रीत हिच्याशी जसमिक सिंग याने...
HomeRatnagiriअवघ्या दोन तासामध्ये गुहागर पोलीसांनी खुन्याला केली अटक

अवघ्या दोन तासामध्ये गुहागर पोलीसांनी खुन्याला केली अटक

आपल्या हातून अनंताचा खून झालाय हे कळल्यावर रात्री उशिरा सुनीलने अनंतचा मृतदेह मांडवकरवाडीतील एका पायवाटेवर आणून टाकला.

गुहागरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आईवरुन शिवी दिली म्हणून डोक्यात कुऱ्हाड मारुन सुनील आग्रेने मित्र अनंत तानु मांडवकर याचा शनिवारी सायंकाळी खून केल्याने मोठी खळबळ उडाली. गावकऱ्यांना रविवारी सकाळी चिखली मांडवकरवाडी परिसरातील एका पायवाटेवर अनंत मांडवकरचा मृतदेह सापडल्याने ग्रामस्थही हादरले.

घरामधील जमीन नुकतीच पुसून काढल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले. अखेर पोलिसी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली. त्यानंतर पोलीस पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या व अवघ्या दोन तासात या तपासात मोठे यश मिळवले. सुरुवातीला चौकशीच्या वेळी सुनील आग्रेने या घटनेशी आपला कोणताही संबंध नसल्याचे सांगत होता.

सायंकाळी पाच ते सात वाजण्याच्या दरम्यान अनंत आणि सुनील यांच्यात जोरदार भांडण झाले. यावेळी अनंतने सुनीलला आईवरुन शिवीगाळ केली. त्याचा राग येवून सुनीलने अनंतच्या डोक्यात कुऱ्हाड मारली. यामध्ये अनंत जागीच ठार झाला. ते पाहून सुनील आपल्या घरात गेला. परंतु, घरामध्ये सुद्धा झालेल्या झटापटीत काही रक्ताचे डाग भिंतीवर आणि जमिनीवर पडलेले पोलिसांनी हेरल्यामुळे अखेर त्याने केलेल्या निर्दयी कृत्याची कबुली दिली.

त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवत अवघ्या दोन तासामध्ये गुहागर पोलीसांनी संशयित आरोपी सुनील महादेव आग्रे वय ४५ वर्षे याला अटक केली आहे.आपल्या हातून अनंताचा खून झालाय हे कळल्यावर रात्री उशिरा सुनीलने अनंतचा मृतदेह मांडवकरवाडीतील एका पायवाटेवर आणून टाकला. घरी येऊन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यामध्ये तो अपयशी ठरला.

RELATED ARTICLES

Most Popular