25 C
Ratnagiri
Sunday, November 23, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriगुहागर तालुक्यात महा-ई सेवा केंद्र व सेतू कार्यालय सुरु करण्याची मागणी

गुहागर तालुक्यात महा-ई सेवा केंद्र व सेतू कार्यालय सुरु करण्याची मागणी

कोरोना काळामुळे काही खाजगी अस्थापना गर्दी होऊन कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी बंद ठेवण्यात आली होती. त्याचप्रमाणे काही शासकीय कार्यालये सुद्धा बंद ठेवण्यात आलेली. विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून विद्यार्थ्यांना जातीचा, उत्पन्नाचा व इतर प्रवेशासाठी आवश्यक असलेले दाखले महा ई सेवा केंद्र व सेतु कार्यालय बंद असल्यामळे मिळणे बंद झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना  प्रवेश प्रक्रियेच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे.

रत्नागिरी चौथ्या टप्प्यामध्ये अनलॉक झाली असून, शासनाकडून कोरोनाचे निर्बध थोड्याफार प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी होऊ नये म्हणून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष विनोद जानवलकर यांनी गुहागर तालुक्यातील सर्व महा-ई-सेवा केंद्र व सेतू कार्यालय त्वरित सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी रत्नागिरी उपविभागीय अधिकारी, चिपळूण, तहसीलदार गुहागर यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे. त्यावेळी मनसे गुहागर तालुकाध्यक्ष विनोद जानवलकर, तालुका महिला विभाग अध्यक्ष मयुरी शिगवण, ग्रामपंचायत सदस्य वैभवी जानवलकर, माजी तालुकाध्यक्ष राजेश शेटे, स्वप्निल कांबळे, दिनेश निवाते, नितीन कारकर, कौस्तुभ कोपरकर, ऋतिक गवाणकर, मयुर शिगवण आदी सदस्य उपस्थित होते.

त्यांनी दिलेल्या निवेदनात असे स्पष्ट म्हटले आहे की, सध्या गुहागर तालुक्यात महा-ई सेवा केंद्र व सेतू कार्यालय बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांपुढे प्रवेशासाठी तसेच ऑनलाईन दाखले मिळण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. शासनाच्या कोरोना निर्बंधाच्या सर्व अटी-शर्थींचे पालन करून महा-ई सेवा केंद्र व सेतू कार्यालय त्वरित सुरू करण्याची मागणी निवेदनात केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular