25.1 C
Ratnagiri
Thursday, November 21, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeIndiaमोरबी दुर्घटना प्रकरणी, पंतप्रधान मोदीनी घेतली जखमींची भेट

मोरबी दुर्घटना प्रकरणी, पंतप्रधान मोदीनी घेतली जखमींची भेट

घटनास्थळाच्या पाहणीनंतर पंतप्रधानांचा ताफा हा या दुर्घटनेतील जखमींची भेट घेण्यासाठी जिल्हा रूग्णालयाकडे रवाना झाला

गुजरातमधील मोरबी येथे मच्छू नदीवरील झुलता पूल अचानक तुटल्याने झालेल्या दुर्घटनेत मृतांची संख्या सोमवारी १३५ वर पोहोचली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोरबी येथे घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी येथील यंत्रणेकडून या दुर्घटनेसंदर्भात सविस्तर आढावा घेतला.

आजचा सलग तिसरा दिवस आहे. या दुर्घटनेस्थळी बचाव आणि शोधकार्य सुरू आहे. या घटनास्थळाच्या पाहणीनंतर पंतप्रधानांचा ताफा हा या दुर्घटनेतील जखमींची भेट घेण्यासाठी जिल्हा रूग्णालयाकडे रवाना झाला आहे. यावेळी पंतप्रधान रूग्णालयातील जखमींची आणि त्यांच्या नातेवाईकांची विचारपूस करणार आहेत.

मोरबी पूल दुर्घटनेत आत्तापर्यंत १३५ हून अधिक जणांचा मृत्यू झाला. मृतांपैकी ४५ जण १८ वर्षांखालील आहेत. मृतांमध्ये मुले, महिला तसेच वृद्धांचे प्रमाण अधिक आहे. १७० हून अधिक जणांना वाचविण्यात आले आहे. ही दुर्घटना रविवारी सायंकाळी ६.३० वाजता घडली होती. ७६५ फूट लांबीचा व ४.५ रुंदीचा हा झुलता पूल अचानक तुटला, तेव्हा या पुलावर ५०० लोक होते आणि ते सर्व नदीत पडले. या दुर्घटनेस जबाबदार ठरलेल्या नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केवडिया येथे भाषणाच्या सुरुवातीलाच मोरबी दुर्घटनेचा उल्लेख केला होता. यावेळी पंतप्रदान मोदी यांचा कंठ यावेळी दाटून आला होता. ते म्हणाले की, “जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या संवेदना आहेत. मी त्यांच्या दु:खात सहभागी आहे. आता लोकांच्या अडचणी कमी व्हाव्यात, हाच प्रयत्न आहे.”

RELATED ARTICLES

Most Popular