28.9 C
Ratnagiri
Monday, December 9, 2024

Huawei च्या Mate 70 मालिकेला प्रचंड मागणी, 67 लाखांहून अधिक युनिट्सचे बुकिंग

चीनी स्मार्टफोन निर्माता Huawei ने गेल्या महिन्यात...

शाहीद कपूरसोबत नॅशनल क्रश तृप्ती डिमरी झळकणार एका नव्या चित्रपटात

तृप्ती डिमरीचा यशस्वी प्रवास - तृप्ती डिमरीने...

IND vs AUS दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव

ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या पिंक बॉल कसोटी सामन्यात...
HomeDapoliदापोलीतील गुरुकृपा कात फॅक्टरी सील, चोरीचा खैर साठा सापडला

दापोलीतील गुरुकृपा कात फॅक्टरी सील, चोरीचा खैर साठा सापडला

कंपनीत एकूण ९३ लिक्विडचे कॅन आढळले.

सांगोला येथील वन विभागाच्या पथकाने विसापूर (ता. दापोली) येथील गुरुकृपा कात फॅक्टरीवर बुधवारी (ता. २९) धाड टाकली. सांगोला येथून आणलेले खैराचे ४७०० किलो लाकूड जप्त केले आहे. त्याशिवाय कंपनीतील खैर लाकडाचे २४१ नग जप्त करण्यात आले आहेत. कातासाठी बनवलेले ३ हजार ७२० लिटरचे ९३ कॅन जप्त करण्यात आले असून, कंपनीतील इतर लाकूड साठ्याचे मोजमाप सुरू आहे. वनविभागाने बुधवारी रात्री ही कंपनी सील केली आहे. सांगोला येथील वनक्षेत्रातून खैराच्या लाकडाची तस्करी करून कोकणात विक्री करणाऱ्या दोघांना सांगोला वनविभागाने अटक केली होती.

त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, वनविभागाने विसापूर येथील गुरुकृपा कात फॅक्टरीवर धाड टाकली. संशयित आरोपी दत्तात्रय गोडसे यांनी विसापूर येथील गुरुकृपा कात फॅक्टरीचे मालक नीलेश शिरोडकर यांना सांगोला येथून खैराच्या लाकडाचा पुरवठा केला होता. गोडसे याने टेम्पोमध्ये लाकूड भरून सांगोला ते खेडपर्यंत आणले होते. शिरोडकर यांच्याकडून खेड येथे वीस हजार रुपये घेऊन त्यांना खैराचे लाकूड भरलेला टेम्पो दिला. शिरोडकर याने खेड ते विसापूरपर्यंत हा टेम्पो आणला. हे तपासामध्ये उघड झाल्यानंतर सांगोला येथील वन विभागाच्या पथकाने विसापूर येथील गुरुकृपा कात फॅक्टरीवर कारवाई केली.

कारवाईदरम्यान त्यांना संशयिताने सांगितलेले खैर लाकडाचे नग सापडले. त्यानुसार सांगोला येथील पथकाने शासनाच्या जागेतून तोडलेल्या खैरावर निळ्या रंगाच्या मार्करने जप्तीची मोहोर उमटवली आणि तो लाकूड साठा दापोली येथील वन विभागाच्या ताब्यात दिला. २०० असोलो अन् सोललेले ४१ नग दापोलीच्या वनविभागाला पुढील चौकशीत कंपनीमध्ये एक बॉयलर, तीन रिऍक्टर, एक स्टीम मशीन सापडली आहे. त्याशिवाय खैर लाकडाचे विनासोललेले २०० नग आणि सोललेले ४१ नग आढळून आले आहेत.

कात बनवण्यासाठी लागणाऱ्या लिक्विडचा साठा मोठ्या प्रमाणावर कंपनीत आढळून आला आहे. कंपनीत एकूण ९३ लिक्विडचे कॅन आढळले. एका कॅनमध्ये ४० लिटर लिक्विड आहे. त्याप्रमाणे एकूण ३ हजार ७२० लिटर लिक्विड कंपनीमध्ये आढळले आहे. सांगोला येथून संशयित आरोपीला घेऊन आलेले पथक आज सकाळी पुन्हा सांगोल्याकडे रवाना झाले. आज दिवसभर दापोलीतील वनविभागाचे कर्मचारी कंपनीची चौकशी करत होते.

RELATED ARTICLES

Most Popular