22.7 C
Ratnagiri
Saturday, December 21, 2024

मंत्री उदय सामंतांचे उद्या होणार जंगी स्वागत…

मंत्री उदय सामंत यांचे रविवारी (ता. २२)...

गुहागरमध्ये मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून २५ जण भाजले

मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून रेडिएटरमधील उकळते, हिरवे...

कुंभार्ली घाटरस्त्याचे काँक्रिटीकरण करा – आमदार शेखर निकम

कुंभार्ली घाटमार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण, पशुसंवर्धन योजनांसाठी संमतीपत्राची...
HomeRatnagiriस्नॅक्स सेंटरमध्ये घुसून डल्ला मारणाऱ्या दोघांना सश्रम कारावास

स्नॅक्स सेंटरमध्ये घुसून डल्ला मारणाऱ्या दोघांना सश्रम कारावास

स्नॅक सेंटरमध्ये विमल गुटखा ठेवता म्हणून आम्ही तपासणी करायला आलो असल्याचे सांगितले.

दोन वर्षांपूर्वी शहरानजीकच्या एमआयडीसी येथील स्नॅक सेंटरमध्ये आपण पोलिस असल्याची बतावणी करते जबरदस्ती घुसून चार हजार रुपयांवर डल्ला मारणाऱ्या दोन सराईत आरोपींपैकी मुख्य आरोपीला न्यायालयाने शुक्रवारी ७ वर्ष सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंड तर त्याच्या साथिदाराला २ वर्ष सश्रम कारावास आणि १ हजार रुपय दंडाची
शिक्षा सुनावली. मुख्य आरोपी शाहिद सादिक मुजावर (३२, रा. धनजीनाका बेलबाग, रत्नागिरी) आणि त्याचा साथिदार फुरकान यासिन फणसोपकर (३०, रा. कोकणनगर, रत्नागिरी) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. त्यांच्या विरोधात खुशबू जैपालसिंग बगेल (१७, रा. एमआयडीसी, रत्नागिरी) हिने ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार, २८ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६.३० वा. सुमारास ती एमआयडीसी येथील आपल्या राहुल स्नॅक सेंटरमध्ये असताना दोन्ही आरोपी दुचाकी वरुन तिथे आले. त्यातील फुरकानने तेथील एका गिऱ्हाईकाला पत्ता विचारण्याचा बहाणा केला.

ती संधी साधत शाहिदने दुकानात प्रवेश करुन फिर्यादी खुशबूला आम्ही पोलिस आहोत अशी बतावणी करत तुम्ही या स्नॅक सेंटरमध्ये विमल गुटखा ठेवता म्हणून आम्ही तपासणी करायला आलो असल्याचे सांगितले. त्यानंतर स्नॅक सेंटरमध्ये जबरदस्तीने आतमध्ये घुसत त्याने फिर्यादीला धक्का दिला. त्यामुळे ती फ्रिजवर आदळली. तिने ओरडण्याचा प्रयत्न केला असता आरोपी शाहिदने आपल्याकडील चाकू काढून ओरडलीस तर तुला मारेन अशी धमकी देत स्नॅक सेंटरच्या गल्ल्यातील ४ हजार रुपये जबरदस्तीने घेऊन आपल्या साथीदारासह दुचाकीवरुन पळून गेला होता. ‘याप्रकरणी फिर्यादी मुलीने ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर संशयितांविरोधात भादंवि कायदा कलम ३९७, ४५२, १७०, ५०६ (३४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. ३० सप्टेंबर २०२२ रोजी पेट्रोलिंग करताना ग्रामीण पोलिसांनी दोन्ही आरोपींना झाडगाव एमआयडीसी येथून अटक केली होती. याप्रकरणी तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक डी. बी. सूर्य यांनी तपास करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

या खटल्यात सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अनिरुध्द फणसेकर यांनी १० साक्षिदार तपासत युक्तिवाद केला. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एस. गोसावी यांनी मुख्य आरोपी शाहिदला भादंवि कायदा कलम ३९२ सह ३४ मधे ७ वर्ष सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड तो न भरल्यास १ महिना सश्रम कारावास, ४५२ सह ३४ मधे ५ वर्ष सश्रम कारावास व ५ हजार दंड तो न भरल्यास १ महिना सश्रम कारावास तसेच भादंवि कलम १७० सह ३४ मधे १ वर्ष सश्रम कारावास आणि ५०६ (२) सह ३४ मधे २ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तर आरोपी फ रकानला भादंवि कायदा कलम ३९२ सह ३४ मधे दोषी ठरवत २ वर्ष सश्रम कारावास व १ हजार रुपये दंड तो न भरल्यास १ महिना सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावत अन्य कलमांतून त्याला निर्दोष मुक्त केले. या खटल्यात कोर्ट पैरवी म्हणून सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुनिल आयरे आणि जिल्हा पैरवी अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक उदय कोंदे यांनी काम पाहिले.

RELATED ARTICLES

Most Popular