31.9 C
Ratnagiri
Sunday, June 4, 2023

इन्फिगो थ्री डी आय क्लिनिकचे पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते शुभारंभ

केवळ व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता सामाजिक जाणीव...

बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न, दोघांना अटक

शहराजवळील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कुवारबाव एटीएम...
HomeRatnagiriहातखंबा येथे दोन ट्रकनी घेतला पेट, तब्बल अडीच तासांनी वाहतूक सुरू

हातखंबा येथे दोन ट्रकनी घेतला पेट, तब्बल अडीच तासांनी वाहतूक सुरू

हा अपघात गावाच्या वरच्या बाजूला झाला. तो अपघात गावात झाला असता तर मोठा अनर्थ झाला असता

हातखंबा येथील तीव्र उतारामध्ये काल सकाळी दोन ट्रकांचा अपघात झाला. या अपघातामध्ये दोन्ही ट्रकनी पेट घेतल्याने परिसरामध्ये घबराट उडाली. आगीने रौद्र रूप धारण केल्याने मागमार्गावर मोठ्या प्रमाणात  धुराचे लोळ उठले. यामुळे गावामध्ये भितीचे वातावरण पसरले. दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात आली. अग्निशमन बंबला पाचारण करण्यात आले. पोलिसयंत्रणा, आरटीओ, हातखंबा टॅब आदी सर्वच घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सर्व परिस्थिती नियंत्रणात आणली. आगीवर ताबा मिळवून मार्ग मोकळा करण्यासाठी काही कालावधी गेला. अपघातामुळे आणि दोन्ही वाहनांनी पेट घेतल्यामुळे या अवजड चौदा आणि सोळाचाकी वाहनांबाबत आता गावकऱ्यांच्या मनात एक प्रकारची भितीच निर्माण झाली आहे.

मुंबई- गोवा महामार्गावरील हातखंबा येथील तीव्र उतार आणि यु आकाराचे वळण हा स्पॉट हातखंबा गावासाठी डेंजर झोन बनू लागला आहे. काही वर्षांपासून यावर अनेक उपाययोजना करूनही अपघात रोखण्यात कोणत्याच यंत्रणांना यश आले नाही. अवजड दोन ट्रकच्या भीषण अपघातामुळे पुन्हा हा विषय चर्चेला आला आहे. आजच्या या अपघाताने गावकरी पुरते हादरून गेले असून, त्यांनी महामार्ग अडवण्याचा प्रयत्न केला; मात्र तेथील लोक प्रतिनिधींनी आणि पोलिस यंत्रणांनी त्यांची समजूत काढून अपघात रोखण्यासाठी काय उपाय करता येईल, यासाठी लवकरच संबंधित यंत्रणेंची बैठक बोलावण्याचा निर्णय झाला. तेव्हा गावकऱ्यांचा आक्रमक पवित्रा कमी झाला.

हा अपघात गावाच्या वरच्या बाजूला झाला. तो अपघात गावात झाला असता तर मोठा अनर्थ झाला असता, या विचाराने संतापलेल्या गावकऱ्यांनी महामार्ग अडवण्याचा प्रयत्न केला. वारंवार या धोकादायक उतारावर अपघात होत आहेत. यावर काही उपाय यंत्रणा करणार आहे की नाही, असा सवाल ग्रामस्थांनी करत रस्त्यावर उतरले; बाळासाहेबांची शिवसेनाचे पदाधिकारी बाबू म्हाप आणि पोलिस अधिकाऱ्यांनी स्थानिकांची समजूत काढली. अखेर सुमारे अडीच तासांनी वाहतूक सुरू झाली.

RELATED ARTICLES

Most Popular