27.5 C
Ratnagiri
Friday, April 26, 2024

जातीय गणिते जुळविण्यासाठी व्यूहरचना, मतांसाठीची चढाओढ

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आता उमेदवारांचा भर जातीच्या...

रत्नागिरी-सिंधुदुर्गात राणेंकडून ठाकरे टार्गेट

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार नारायण...

सत्ता जाण्याच्या भीतीने मोदी घाबरले आहेत – राहुल गांधी

लोकसभेची ही निवडणूक लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी...
HomeRajapurराजापूर तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये, लम्पी संसर्गित जनावरे अधिक

राजापूर तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये, लम्पी संसर्गित जनावरे अधिक

पूर्व भागातील पाचल, तळवडे, मूर, वाळवड या गावांचा समावेश असल्याचेही पशु विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे

मागील काही महिन्यांपासून जनारांना होणाऱ्या लम्पी त्वचा आजाराच्या संसर्गामध्ये वाढ होऊ लागली आहे. आजपर्यंत तालुक्यातील सुमारे ९० हून अधिक जनावरांना लम्पी आजाराचा संसर्ग झाल्याची माहिती पंचायत समितीच्या पशुविभागाकडून देण्यात आली आहे. यामध्ये तालुक्याच्या पूर्व भागातील म्हणजेच राजापूर तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये, अन्य भागाच्या तुलनेमध्ये लम्पी आजाराचा संसर्ग झालेल्या जनावरांची संख्या अधिक असल्याची आढळून आली आहे. त्यामध्ये पूर्व भागातील पाचल, तळवडे, मूर, वाळवड या गावांचा समावेश असल्याचेही पशु विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त महाळुंगे गावामध्ये लम्पी आजाराचा संसर्ग झालेली जनावरे आढळल्याची माहिती देण्यात आली आहे. यापैकी बहुतांश जनावरे बरे झाल्याचेही या वेळी स्पष्ट करण्यात आले.

लम्पी रोगाचे निदान झाल्यापासून तातडीने आरोग्य विभागाने उपाययोजना आणि लसीकरण करायला सुरुवात केली आहे. तरीही तालुक्यामध्ये जनावरांना होणाऱ्या लम्पी त्वचा आजाराने चांगलेच डोके वर काढलेले दिसून येत आहे. राजापूर तालुक्यात गावांमधील जनावरांना लम्पी आजाराचा अधिक संसर्ग झाल्याचे चित्र आहे. या आजाराच्या वाढत्या संसर्गामुळे शेतकऱ्यांचे गोधन अडचणीत आले आहे. संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी पशुविभाग प्रयत्नशील असल्याची माहिती सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ. सुर्वे यांनी दिली. तालुक्यातील सुमारे २३ हजार जनावरांना लसीकरण करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट कले.

घडते असे कि, दिवाळीनंतर गावोगावच्या शेतकऱ्याकडून दिवसभर मोकाट जनावरे सोडली जातात. या सोडण्यात आलेल्या मोकाट जनावरांमध्ये एखादं लम्पी संसर्ग झालेले जनावर असल्यास त्यामुळे अन्य मोकाट सोडलेल्या जनावरांमध्ये लम्पीचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येण्यासारखी नाही. त्यामुळे शेतकऱ्यानी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन पशुविभागाकडून करण्यात आली  आहे.  लम्पी आजाराचा संसर्ग कमी करण्यासाठी पशुविभागाकडून योग्य त्या उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती डॉ. सुर्वे यांनी दिली.

RELATED ARTICLES

Most Popular