27.3 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeRatnagiriहातखंबा येथील दळवी कॅशूमध्ये चोरी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या

हातखंबा येथील दळवी कॅशूमध्ये चोरी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या

रत्नागिरी ग्रामीण पोलीस गस्ती पथकाच्या सतर्कतेमुळे तीन संशयित आरोपींच्या मुसक्या आवळण्यात मोठे यश आले आहे.

रत्नागिरी शहराजवळ हातखंबा येथे दळवी कॅशूमध्ये लाखो रुपयांची काजू बी चोरी होण्याचा प्रकार दोनवेळा घडला होता. त्यामुळे रत्नागिरी पोलीसांसमोर तपासाचे मोठे आव्हान निर्माण झाले होते. शुक्रवारी रात्री २९ जूनला रत्नागिरी ग्रामीण पोलीस गस्ती पथकाच्या सतर्कतेमुळे तीन संशयित आरोपींच्या मुसक्या आवळण्यात मोठे यश आले आहे. आरोपींकडून आठ लाख रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे.

गोळप परिसरात संशयित रित्या ह्युंदाई कार उभी दिसली. पण पोलीस जवळ येताच ही कार चालकाने सुसाट नेली. यानंतर सुरू झाला थरारक पाठलाग. कार पावसाच्या दिशेने सुसाट गेली. गस्ती पथकाने प्रसंगावधान ठेवत तात्काळ पूर्णगड पोलिसांना याची माहिती दिली. पावस येथे ही कार थांबवून चौकशी करून तीन संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या आणि मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना मोठे यश आले.

रज्जाक असलम मुजावर, वय २३, रा. नांग्रे सांगली बायपास पलूस रोड, इनाम पट्टी ता. मिरज जि. सांगली, साहिल इसाक सायनावाले, वय २२, रा. करासवाडा म्हापसा, बार्देश नॉर्थ गोवा, अक्षय संतोष पाटील, वय २४, रा. देवकांडगाव ता. आजरा जि. कोल्हापूर यांना तात्काळ ताब्यात घेवून रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचे तपासात अटक करण्यात आली. गुन्ह्यात वापरण्यात आलेली कार, गुन्ह्याकरीता वापरण्यात आलेली हत्यारे व गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल असा एकूण ८ लाखांचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. मोहीतकुमार गर्ग, उपविभागिय पोलीस अधिकारी वाघमारे यांचे मार्गदर्शनाखाली ही मोठी तपास मोहिम फत्ते झाली. या संशयितांची अधिक चौकशी करता मागील सुमारे तीन महिन्यांपूर्वी निवळी येथील दळवी कॅशू येथील चोरी करून सुमारे २,२०,०००/- रुपये किंमतीच्या काजू बिया चोरून नेल्याचीही कबुली दिली आहे. या सगळ्या पोलीसांनी टीम वर्कने ही कामगिरी बजावली. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्याहस्ते त्यांचा गुरूवारी ३० जूनला गौरव करण्यात आला.

RELATED ARTICLES

Most Popular