22.7 C
Ratnagiri
Sunday, December 22, 2024

मंत्री उदय सामंतांचे उद्या होणार जंगी स्वागत…

मंत्री उदय सामंत यांचे रविवारी (ता. २२)...

गुहागरमध्ये मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून २५ जण भाजले

मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून रेडिएटरमधील उकळते, हिरवे...

कुंभार्ली घाटरस्त्याचे काँक्रिटीकरण करा – आमदार शेखर निकम

कुंभार्ली घाटमार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण, पशुसंवर्धन योजनांसाठी संमतीपत्राची...
HomeRatnagiriजिंदाल वायूगळतीच्या घातक परिणामांची सर्वांना चिंता….

जिंदाल वायूगळतीच्या घातक परिणामांची सर्वांना चिंता….

पॅरेलिसीस सदृश्य त्रास होत असून तर किडनी निकामी होण्याची भीती व्यक्त करण्यात आली.

जिंदाल कंपनीच्या वायूगळतीमुळे १०० पेक्षाही अधिक विद्यार्थी व ग्रामस्थ वायुबाधित झाले आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले. काल सायंकाळी हॉस्पिटलमध्ये ३१ जण दाखल होते त्यापैकी २७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला परंतु उर्वरीत ४ मुलींची प्रकृती अजूनही ‘नॉर्मल’ न झाल्याने त्यांना आय. सी. यू. मध्ये ठेवण्यात आले आहे. यापैकी २ मुलींना पॅरेलिसीस सदृश्य त्रास होत असून एका निष्पाप मुलीची तर किडनी निकामी होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. ज्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला त्यांच्यावर पुढील कोणते घातक परिणाम होतील हे सांगता येत नाही… याला जबाबदार कोण? असा सणसणीत सवाल संतप्त जनतेतून विचारला जात आहे. जयगड येथील जिंदाल कंपनीच्या या वायूगळतीमुळे जनतेत प्रचंड संताप निर्माण झाला आहे.

४ निष्पाप विद्यार्थिनी – जिंदालच्या वायूगळतीमुळे १०० ते १२५ विद्यार्थी व ग्रामस्थ घायाळ झाले आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. गुरु. दि. १२ डिसें. पासून हे वायूगळतीचे प्रकरण सुरु झाले. काल सायंकाळी हॉस्पिटलमध्ये ३१ जण दाखल होते. त्यापैकी २७ जणांना घरी पाठविण्यात आले. उर्वरीत ४ विद्यार्थिनी असून त्यांची प्रकृती अद्याप ठिकठाक नसल्याने त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

पॅरेलिसीस, किडणीचा त्रास ? – यापैकी एक दहावीतील विद्यार्थिनी व दुसरी १२ वीतील विद्यार्थिनी असून त्यांना पायाला मोठ्या प्रमाणावर मुंग्या येतात, पायात प्रचंड पेटके येतात व वेदना होतात आणि पॅरेलिसीस सदृश्य त्रास होत असल्याचे सांगण्यात आले. तिसऱ्या ८ वीत शिकणाऱ्या मुलीच्या पोटात प्रचंड वेदना होतात तसेच डोक्यातही जबर वेदना होतात. चौथी मुलगी १० वीत शिकते. तिच्या किडण्या निकामी होण्याची वायूगळतीमुळे परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. जिंदाल वायूगळतीचे असे भीषण परिणाम होणार असतील तर मग ही जबाबदारी कुणाची? असा संतप्त सवाल आता जनतेतून विचारला जात आहे.

वायूगळतीचे दुष्परिणाम ? – ज्या विद्यार्थ्यांना उपचार देऊन घरी पाठविण्यात आले त्यापैकी अनेकजण पुन्हा प्रकृतीचा त्रास सुरु झाल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. या वायूगळतीचे दुष्परिणाम काही काळानंतर आस्ते आस्ते जाणवतात का? याची चिंता आता सर्व पालकांना व ग्रामस्थांना लागून राहिली आहे. यामध्ये बिचाऱ्या गरीब विद्यार्थ्यांचा, त्यांच्या पालकांचा व ग्रामस्थांचा काय दोष आहे? कंपनीला फायदा मिळावा यासाठी या सर्वांचा जीव पणाला लावायचा का? कंपनीला त्याचे काहीच वाटत नाही का? असे संतप्त सवाल आता ग्रामस्थ विचारु लागले आहेत.

गरीबांना वाली नाही! – दरम्यान जयगड परिसरातील तसेच खंडाळा वाटद परिसरातील काही संघटनांनी व सामाजिक जाणीवेचे भान असणाऱ्या मान्यवरांनी ही कंपनी ताबडतोब बंद करावी अशी मागणी केली आहे. परंतु कंपनीचे हात ‘वरपर्यंत’ पोचले असल्याचे सांगण्यात येते. सुमारे १२५ पर्यंत वायूबाधितांची संख्या जाऊनही कंपनीचे कामकाज तपासणी होईपर्यंत स्थगित ठेवण्याचा निर्णय देखील घेतला जात नाही यातच सारे काही आले असे मत याबाबत बोलताना संतप्त नागरिकांनी व्यक्त केले… अखेर गरीबाला कुणी वाली नसतो हेच खरे असे आता जनतेत खुलेआम बोलले जाऊ लागले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular