29.7 C
Ratnagiri
Sunday, June 16, 2024

इंदवटीतील दोन कुटुंबांचा स्थलांतरास नकार, १८० कुटुंबांना नोटिसा

तालुक्यातील दरडग्रस्त आणि भूस्खलन प्रवणक्षेत्रातील गावातील ग्रामस्थांना...

शाळांच्या परिसरात सीसीटीव्ही बसवा, पोलिस अधीक्षक कुलकर्णी

सर्व शाळांच्या परिसरामध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी, तसेच...

चिपळुणात ठाकरेंच्या पाठीशी नवी ताकद

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार...
HomeMaharashtraआरोग्यमंत्री राजेश टोपेंची कोरोना निर्बंधासंबंधी मोठी घोषणा

आरोग्यमंत्री राजेश टोपेंची कोरोना निर्बंधासंबंधी मोठी घोषणा

संक्रमित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घातल्याने, शासनाने आधीच कोरोना निर्बंध खूप कमी केले आहेत.

राज्यात कोरोनाची लाट बऱ्याच प्रमाणात ओसरत चालली आहे. संक्रमित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घातल्याने, शासनाने आधीच कोरोना निर्बंध खूप कमी केले आहेत. त्यामुळे ज्या शासकीय कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आलेली ती उठविण्यात आली आहे. त्यामुळे यंदा १४ एप्रिलला आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. १ एप्रिल पासून अनेक निर्बंधांमध्ये बदल घडून येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

तर गुढीपाडव्याला शोभायात्रा काढण्याबाबत निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पुढे ते असे म्हणाले कि, राज्य सरकारने जे काही निर्बंध लावले होते, त्याबद्दल आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडत असतो. त्यानंतर मास्क मुक्त असेल किंवा सोशल डिस्टसिंगचे नियम असो, त्याबद्दल अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. मास्क बंदी लगेच हटवली जाणार नाही. कारण कोरोनाची लाट जरी ओसरली असली तर धोका अजूनही कायम आहे.

जर कुणी बाधित असेल तर त्यामुळे इतर लोक बाधित होऊ शकतात, त्यामुळे घाईघाईने मास्क बंदी हटवली जाणार नाही, असं राजेश टोपेंनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. पुढे ते म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून गुढीपाडवा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीही घरीच साजरी करण्यात आली आहे. पण, यंदा आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयाचं आम्ही सर्वांनी स्वागत केलं आहे. तर हिंदू नववर्ष गुढीपाडव्याला शोभायात्रा काढण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार आहे, असंही टोपे यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES

Most Popular