28.6 C
Ratnagiri
Friday, August 1, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeLifestyleदीर्घायुषी व्हायचं असेल तर, करा या सवयींचा अवलंब

दीर्घायुषी व्हायचं असेल तर, करा या सवयींचा अवलंब

शाकाहाराचे महत्व पूराण काळापासून ग्रंथांमध्ये देखील सांगण्यात आले आहे.

ज्याप्रमाणे लहान मुलांच्या योग्य आहाराकडे लक्ष दिल्यावर त्यांची योग्य प्रमाणात आणि सुदृढ वाढ होते, त्याचप्रमाणे आहारच्या काही विशिष्ट सवयींचा अवलंब केला तर, नक्कीच प्रत्येकाच्या आयुष्याची दोर मजबुतपणे वाढू शकेल. दरवर्षी जगामध्ये अचानक होणारे २० टक्के मृत्यू हे चुकीच्या आहाराच्या सवयीमुळेच होतात. त्यामुळे आहार तज्ञ आवर्जून सांगतात कि, निरोगी आणि दीर्घायुष्य जगायचे हवे असेल तर प्रथम  घेण्यात येत असणाऱ्या आपल्या आहारामध्ये ताज्या भाज्या आणि फळांचा समावेश करणे गरजेचे असल्याचा सल्ला तज्ज्ञ देत असतात.

हल्लीची जीवनशैली एकतर धावपळीची, घड्याळ्याच्या काट्यावर चालणारी. एकही मिनिट इथे तिथे झाले तर सगळ्याच गोष्टींचा ताळमेळ बसविताना नाकी नऊ येते. पण अशा घाई गडबडीच्या जीवनशैलीमुळे भविष्यात अनेक प्रकारच्या आजारांना निमंत्रण आपण देत असतो. तरुणांमध्ये आत्तापासून, प्रेशर, हृदयविकार, मधुमेह आणि स्थूलपणा हे विकार शरीरात वास्तव्यास आले आहेत. स्थूलपणामुळे अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. जे आजार पुरवी खूपच दुर्मिळ होतेत ते आता सर्हास झालेले ऐकिवात आहेत. पण आहार आणि वेळेचे योग्य नियोजन केले तर या सर्व आजाराना शरीरात जडण्यापुर्वीच दूर ठेवता येणे शक्य आहे.

शाकाहाराचे महत्व पूराण काळापासून ग्रंथांमध्ये देखील सांगण्यात आले आहे. प्रत्येकाने निरोगी राहण्यासाठी आपल्या दररोजच्या आहारामध्ये ५० टक्के भाग फलाहार आणि ताज्या भाज्या तर उर्वरित भाग प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट्स मध्ये विभाजीत केला तर योग्य आहाराच्या सेवनामुळे आरोग्याच्या तक्रारी दूर होऊ शकतात. दररोजची भूक ५० टक्के प्रमाणात फक्त फळं आणि ताज्या भाज्याच्या माध्यमातूनच भागली पाहिजे असा सल्ला आहार तज्ञांनी दिला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular