26 C
Ratnagiri
Sunday, February 23, 2025

भंगार ठेवण्याच्या जागा भाड्यावरून वाद, एसटी विभाग-खरेदीदार आमनेसामने

एसटी महामंडळाच्या येथील विभागीय कार्यशाळा आवारातील भंगार...

भाड्याने घेतलेल्या गाड्यांची परस्पर विक्री, दोघा संशयितांना अटक

गाड्या भाड्याने लावतो सांगून नवीन गाड्या खरेदी...

रत्नागिरी हायटेक बसस्थानकाचे ९० टक्के काम पूर्ण

पाच वर्ष रखडलेले हायटेक मुख्य बसस्थानकाचे काम...
HomeDapoliमिनी महाबळेश्वरला उष्णतेच्या झळा, पारा ३७.८ अंश

मिनी महाबळेश्वरला उष्णतेच्या झळा, पारा ३७.८ अंश

कलिंगड, सरबत तथा थंड पेयांची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे.

दापोली तालुक्यात उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. दापोलीत शनिवारी ३७.८ अंश तापमान नोंदवले गेले. या उकाड्याने नागरिक हैराण झाले असून, सकाळी साधारण १० वाजल्यानंतरच उन्हाचे चटके बसू लागल्याने नागरिक बाहेरच पडत नाहीत. त्यामुळे सुटीचा वार असूनही बाजारात शुकशुकाट होता. गेल्या १५ ते २० दिवसांपूर्वीपासून सकाळचे वातावरण थंड. त्यानंतर ११ वाजल्यानंतर उष्ण आणि रात्री पुन्हा थंड वातावरण असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. १ फेब्रुवारी या दिवशी किमान तापमान ९.४, तर कमाल तापमान ३१.७होते. तिथून वातावरणात चांगलाच फरक पडत गेला. दोन्हीही तापमानात वाढ होऊ लागली. १४ फेब्रुवारीला तर कमाल तापमान ३६.४, तर किमान तापमान ११.९ अंश सेल्सियस असे होते. त्यानंतर तापमानात बऱ्यापैकी वाढ होऊ लागली असून, सकाळी साधारण सकाळी १० वाजल्यानंतर उन्हाचे चटके बसू लागले आहेत. तालुक्यात गेल्या १५ दिवसांपासून कमाल तापमानात वाढ झाली असून, आज ते ३७.८ अंशापर्यंत गेले आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेस रस्त्यावर खूपच कमी वर्दळ असते.

दिवसभर होणाऱ्या उकाड्यामुळे शीतपेयाच्या दुकानांत गर्दी होत असून, कलिंगड, सरबत तथा थंड पेयांची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. जागोजागी कलिंगड विक्रीचे स्टॉल वाढले आहेत. महिलावर्गामध्ये स्कार्फ वापरण्याचे प्रमाण सुरू झाले आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. २०) सकाळी ८ वाजल्यापासून ते शुक्रवारी (ता. २१) सकाळी ८ वाजेपर्यंत नोंदवले गेलेले कमाल तापमान ३७.८, तर किमान तापमान १३.६ अंश सेल्सिअस होते. गुरुवारी (ता. २०) कमाल तापमान ३४.८, किमान १३.२, २० तारखेला कमाल ३२.२, किमान १०.९ अंश, तर १९ तारखेला कमाल ३४.५, किमान १२.६, १८ तारखेला कमाल ३५.२, किमान १२.५ सेल्सिअस इतके होते. आता थंडी कमी होऊन उष्णतेत वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular