27.2 C
Ratnagiri
Sunday, July 27, 2025

‘कापसाळपर्यंत पुला’साठी जनमताचा रेटा हवा – आमदार शेखर निकम

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण शहरातून जाणारा उड्डाणपूल...

मच्छीमार समुद्रावर स्वार होण्यासाठी सज्ज…

गेले दोन महिने बंद असलेली मासेमारी १...

कर्जी खाडीपट्ट्यातील वीजपुरवठा सुरळीत…

महावितरणच्या खेड विभागातील लोटे उपविभागांतर्गत येणाऱ्या कर्जी...
HomeRatnagiriजिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस समुद्र खवळला

जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस समुद्र खवळला

किनारपट्टी भागात वाहणारे वेगवान वारे धडकी भरवणारे होते.

हवामान विभागाने शनिवारी दिवसभर मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविला होता. त्याप्रमाणे काल रात्रीपासून वेगवान वाऱ्यांसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोर आज दिवसभर सुरू होता. त्यामुळे हवेत गारवा होता, मात्र किनारपट्टी भागात वाहणारे वेगवान वारे धडकी भरवणारे होते. देवरूख येथे बौद्धवाडी येथील घरावर भलेमोठे झाड कोसळले. सुदैवाने घरात कोणीही नव्हते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. यामध्ये घराचे सुमारे ३ लाखांचे नुकसान झाले आहे. लांजा तालुक्यातील कीर्तीनगर येथे रोहिदासवाडी येथील मनोहर लांजेकर यांच्या घरावर झाड पडून नुकसान झाले असून, त्याचा पंचनामा करण्यात आलेला नव्हता. राजापूर तालुक्यातील कुवेशी येथील गिरीश शिरधनकर यांच्या घरावर झाड पडून ५ हजार रुपयांचे, तर उपळे येथील हमीद शिरगावकर यांची लाकडे ठेवण्याची झोपडी कोसळून १० हजारांचे नुकसान झाले. दापोली तालुक्यातील ताडील येथील इक्बाल मुंशी संरक्षक भिंत पडली असून, नदीचे पाणी भातशेतीमध्ये शिरले आहे. रत्नागिरीतील काजळी नदीची पाणीपातळी वाढली असून, पुराचे पाणी पोमेंडी येथील भातशेतीत आले होते.

तिसऱ्या दिवशीही समुद्राला उधाण – आमावस्येनंतर सलग तिसऱ्या दिवशीही समुद्राला उधाण आलेले आहे. त्यामुळे किनारी भागात अजस्त्र लाटांचे तांडव सुरू होते. समुद्र खवळलेला असला, तरीही गणपतीपुळे किनारी पर्यटकांचा राबता किनाऱ्या पाहायला मिळत होता. काही पर्यटक समुद्राच्या लाटांपर्यंत जात होते. शनिवार, रविवार सुटी असल्यामुळे परजिल्ह्यातील पर्यटक समुद्रकिनारी भागात फिरण्यासाठी दाखल झालेले आहेत. प्रसिद्ध गणपतीपुळे पर्यटनस्थळी पर्यटकांचा राबता वाढलेला आहे. समुद्र खवळलेला असून, पर्यटकांनी किनाऱ्यावर जाऊ नये, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

दाभोळ-दापोली रस्त्यावर झाड कोसळले – तालुक्यात गेले चार दिवस मुसळधार पाऊस पडत असून, शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास दाभोळ-दापोली मुख्य रस्त्यावर आज दुपारी झाड कोसळले. त्यामुळे लाठीमाळ ते उंबर्लेदरम्यान सैतवडेकर बागेजवळ सुमारे तासभर वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी तत्परता दाखवत स्थानिक नागरिकांसह प्रवाशांनी स्वःखुशीने मदतीसाठी पुढाकार घेतला. पंचनदी हायस्कूलचे शिक्षक आशुतोष साळुंखे, तेरेवायंगणी प्रशालेचे शिक्षक प्रशांत पांडे, अजय वायंगणकर, अर्चना मकू, अंकुर चव्हाण यांच्यासह अनेकांनी झाड रस्त्याच्या कडेला हलवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. एसटी बसचे वाहक शुभम देवाळे आणि चालक यांचाही सहभाग होता. एका तासांत झाड बाजूला करण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular