26.2 C
Ratnagiri
Sunday, September 8, 2024

19 वर्षीय फलंदाजाने रचला इतिहास, मोडला सचिन तेंडुलकरचा 33 वर्ष जुना विक्रम

दुलीप करंडक स्पर्धेला ५ सप्टेंबरपासून सुरुवात झाली...

या दिवशी रिलीज होणार ‘पंचायत’चा तामिळ रिमेक…

'पंचायत' ही हिंदीतील सर्वात प्रसिद्ध आणि हिट...
HomeMaharashtraयेत्या ७२ तासात मुसळधार पाऊस?

येत्या ७२ तासात मुसळधार पाऊस?

मुंबईत मान्सून येत्या ७२ तासांमध्ये दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. मुंबईसह कोकणातही आगामी ७२ तासात मुसळधार पर्जन्यवृष्टी होऊ शकते. हवामान तज्ज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, अरबी समुद्रात मान्सून सक्रीय होण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या आहेत. यामुळे रत्नागिरीत ‍ मान्सूनचा थांबलेला प्रवास सुरु होणार आहे. येत्या ७२ तासांत तो मुंबईत दाखल होणार आहे. दक्षिणेत पाऊस सामान्यपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. तसेच येत्या आठवड्यात उत्तर-पश्चिम भारत, मध्य, पूर्व आणि ईशान्य भारताच्या मैदानी भागांमध्ये सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. बिपरजॉय वादळ गुजरातमधून राजस्थान व मध्य प्रदेशात सरकले असले तरी गुजरातमधील त्याची तीव्रता अजूनही पूर्णपणे संपलेली नाही आणि . त्याचाच परिणाम म्हणून विविध जिल्ह्यांत सुसाट वारे वाहत आहेत.

अर्थात, अजून काही दिवस असेच वारे वाहात राहणार आहेत आणि २२-२३ जूननंतर पावसाला सुरुवात होईल. यामध्ये प्रामुख्याने मुंबई आणि कोकणचा भाग असेल. जूनचा शेवटचा आठवडा हा धुवाँधार पावसाचा असेल, अंदाज हवामानतज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी व्यक्त केला आहे.. असा गुजरातमधील वादळाचा परिणाम म्हणूनच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये काही दिवसांपासून सुसाट वारे वाहात आहेत. हे वारे अजून काही दिवस असेच वाहात राहणार आहेत. अर्थात, वारे वाहणार असले, तरी वादळासारखी स्थिती नसेल. मात्र, पाऊस पडण्याची शक्यता नसून, सध्या केवळ वारेच वाहणार आहेत. २२ ते २३ जूननंतर मात्र मराठवाडा व विदर्भात पावसाला सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे २५ जूननंतर सर्वत्र चांगल्या पावसाची शक्यता आहे, असेही औंधकर यांनी सांगितले.

निम्मा जून महिना संपला, तरी पाऊस नसल्याची स्थिती संपूर्ण राज्यात आहे. हीच स्थिती पुढील आठवडाभर राहण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मात्र, जून महिन्याचा शेवटचा आठवडा हा पावसाचाच असेल आणि या पावसाने जून महिन्याची बरीचशी तूट भरून निघेल, असाही अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. मात्र मान्सूनसाठी स्थिती अनुकूल होत असली तरी अनेक भागात उष्णतेचा पारा देखील चढला आहे. काही भागात तापमान ४० डिग्री सेल्सीअसपर्यंत पोहोसले आहे. विशेषत: विदर्भात सूर्य आग ओकतो आहे. या पार्श्वभूमीवर सर्वाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular