29.8 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriरत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस चांदेराईत पाणी घुसले, तोणदेतील मंदिर पाण्याखाली...

रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस चांदेराईत पाणी घुसले, तोणदेतील मंदिर पाण्याखाली…

हवामान खात्याने सलग तीन दिवस रेड अॅलर्ट दिला असल्याने प्रशासनदेखील आकाशाकडे डोळे लावून बसले आहे.

रत्नागिरीमध्ये पावसाने उडवली एकच दाणादाण चांदेराईत पाणी घुसले, तोणदेतील मंदिर पाण्याखाली रत्नागिरीत निवळी घाटात दरड कोसळल्याने काही तास वाहतूक ठप्प झाली तर चांदेराई, टेंबेपूल, सोमेश्वर, केळ्ये आदी गावांमध्ये नदीचे पाणी आल्याने या गावांचा शहराशी संपर्क तुटला होता. गेले दोन दिवस जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. हवामान खात्याने सलग तीन दिवस रेड अॅलर्ट दिला असल्याने प्रशासनदेखील आकाशाकडे डोळे लावून बसले आहे. कधी काय घडेल हे सांगता येत नसल्याने सर्व यंत्रणा जिल्ह्यात सज्ज ठेवण्यात आली आहे.

निवळीत दरड कोसळली – गुरूवारी सकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस कोसळत असतानाच निवळी घाटात दरड कोसळल्याचे वृत्त सोशल मिडियावर प्रसारित होताच साऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. अवघ्या काही तासाच स्थानिकांच्या मदतीने हा घाट पुन्हा वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आला.

चांदेराईत पुराचे पाणी – गेले दोन दिवस चांदेराईच्या बाजारपेठेत पुराचे पाणी शिरणार अशी भीती निर्माण झाली होती. गुरूवारी पहाटेच ही भीती सत्त्यात उतरली. काजळी नदीचे पाणी पहाटेपासून चांदेराई बाजारपेठेत शिरायला सुरूवात झाली आणि बघताबघता बाजारपेठ पाण्याखाली आली. पाणी भरण्याची भीती असल्याने दुकानदारांनी वेळीच दुकानातील सामानाची दुसरीकडे व्यवस्था करून ठेवली होती.

घरांमध्ये पाणी – मिळालेल्या माहितीनुसार चांदेराई बाजारपेठेसह नजीकच्या काही घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने भर पावसात साऱ्यांची धावाधाव सुरू झाली. दुपारपर्यंत काजळी नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाढ झाल्याचे चित्र पहायला मिळत होते. पुराचे पाणी पुलावरून वाहू लागल्याने चांदेराईमार्गे लांजा वाहतूक ठप्प झाली होती.

केळ्येत पुलावरून पाणी – पावसाचा जोर गुरूवारी पहाटेपासून वाढल्याने अनेक छोट्या-मोठ्या नद्यांना पूर आला आहे. या पुराचे पाणी रस्त्यांपर्यंत येऊन पोहोचले होते. असाच प्रकार शहरानजीकच्या केळ्ये परिसरात घडला आहे. येथील नदीचे पाणी रस्त्यासह पुलावरून धो-धो वाहत होते. त्यामुळे केळ्ये गावाचा शहराशी संपर्क काहीकाळ तुटला होता.

पुराची टांगती तलवार – जिल्ह्यात सरासरी १०९.७८ मि.मी. पाऊस झाला असून एकूण ९८८ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद आहे. खेड तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून, जगबुडीसह नारिंगी नदी धोक्याची पातळी ओलांडली आहे. खेड शहरावर पुराची टांगती तलवार आहे. त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आहे.

कोतवडेत घरात पाणी – रत्नागिरी तालुक्यातील कोतवडेत एका घरात पाणी शिरले. त्यामुळे ४ लोकांना स्थलांतरित करण्यात आले. या चार लोकांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले असून दुपारपर्यंत कोतवडेत पाण्याची भीती निर्माण झाली होती. प्रशासन कोतवडे येथील नदीतील पाण्यावर लक्ष ठेवून होते.

सोमेश्वरात पाणीच पाणी – गेले दोन दिवस तालुक्यातील सोमेश्वर गावाला पाण्याने वेढा घातला आहे. गुरूवारी तर मोठ्या प्रमाणात पाणी सोमेश्वर गावात शिरले होते. नदीचे पाणी पात्राबाहेर आल्याने नजीकच्या घरांना धोका निर्माण झाला होता. या ठिकाणी नदीकाठच्या कुटुंबांना स्थलांतर होण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या. सोमगंगा नदीला पूर आल्यामुळे नेवरे गावात पाणी भरले होते. शंभरहून अधिक लोकांची भातशेती पाण्याखाली गेली आहे. हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलेल आहे. मुसळधार पावसामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शाळा विद्यालयांना गुरूवारी सुट्टी जाहीर करण्यात आली.

बाव नदीच्या पुलावर पाणी!!! – मुंबई-गोवा महामार्गांवर बावनदी पुलावरून पाणी वहात आहे. पाली बायपास रोडवरील शेल्टीवाडी बावनदी ‘पाली बायपास रोडवरील शेल्टीवाडी पूलाजवळ शेल्टीवाडीतील शेतीच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. नदीचे पाणी भातशेतीमध्ये घुसल्याने शेतीचे नुकसान झाले आहे.

तोणदेतील सांब मंदिर – पाण्याखाली रत्नागिरी तालुक्यातील तोणदे गावातील शिव सांब मंदिर पाण्याखाली गेले आहे. मंदिराच्या सभोवताली पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular