19.8 C
Ratnagiri
Sunday, January 25, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeChiplunचिपळूणमधून सोलापुरातील पाकणी पूरग्रस्तांसाठी मदत

चिपळूणमधून सोलापुरातील पाकणी पूरग्रस्तांसाठी मदत

पहिल्या मदतीचा ट्रक मंगळवारी सकाळी रवाना झाला.

सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर भागातील पाकणी पूरग्रस्त गावात बाधित ५०० कुटुंबीयांसाठी जीवनावश्यक वस्तूंच्या पहिल्या मदतीचा ट्रक मंगळवारी (ता. ३०) चिपळूणवासीयांच्या माध्यमातून सकाळी रवाना होणार आहे. प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्या पुढाकाराने सर्व चिपळूण तालुकावासीयांच्या सहकार्याने अवघ्या दीड दिवसांत जीवनावश्यक वस्तू जमा झाल्या असून, शहर परिसरासह तालुक्यातून मदत करण्यासाठी सहभाग घेतला. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, सोलापूर आदी परिसरात परतीच्या पावसाने त्या भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत करून टाकले आहे. जुलै २०२१ मध्ये चिपळूणला देखील महाभयंकर पुराचा फटका बसला होता. त्यावेळी राज्यभरातून चिपळूणसाठी जीवनावश्यक वस्तूंची मदत आली होती. ही बाब लक्षात घेता दोन दिवसांपासून समाज माध्यमांवर पूग्रस्त कुटुंबांना मदत करण्याबाबत चर्चा सुरू होती.  मदतीत सुसूत्रता यावी यासाठी समाज माध्यमांवर प्रांताधिकारी यांच्यासह जबाबदार अधिकाऱ्यांना आवाहन करण्यात आले. त्यानुसार प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी पुढाकार घेत सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूरमधील पाकणी या गावातील साडेतिनशे बाधित कुटुंबांना कोणती मदत हवी आहे, याबाबत माहिती घेतली.

त्यानुसार कापसाळ येथील शासकीय विश्रामगृहावर जीवनावश्यक वस्तूंची मदत एकत्र करून ती पाठविण्याबाबत नियोजन झाले. त्यासाठी प्रांताधिकारी लिगाडे यांनी शासकीय कर्मचाऱ्यांचे सहकार्य घेतले. प्रांताधिकारी यांनी नियोजन करून आवाहन केल्यानुसार अवघ्या दीड दिवसांत कपड्यांसह जीवनावश्यक वस्तू जमा झाल्या आहेत. या सर्व वस्तू मंगळवारी (ता. ३०) सकाळी पाकणी गावातील पूरग्रस्त कुटुंबांपर्यंत पोहोचविल्या जाणार आहेत. कपडे धुण्याचा साबण ७०० नग, आंघोळीचा साबण १४०० नग, ३५०० किलो गहू, १७५० किलो तांदूळ, खोबरेल तेल ३५० नग, दंतमंजन, १४०० टूथब्रश, बिस्कीट ५ हजार रूपये, मच्छर अगरबत्ती ७०० नग, लहान-मोठा बरमुडा पॅन्ट २५, टॉवेल १४०० नग, साडी ७० नग, लहान-मोठ्या ट्रॅक पॅन्ट ३५० आदी आवश्यक साहित्य जमा झाले असून, ते मंगळवारी रवाना केले जाणार आहे.

सहकार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था – मदत करणाऱ्यांमध्ये लायन्स क्लब सावर्डे, कोकण बाजार चिपळूण, ओक पेढी चिपळूण, आदर्श वस्तू भांडार, साई प्रतिष्ठान खेर्डी, पंचायत समिती चिपळूण, न्यू मंगल स्टोअर चिपळूण, सौरभ कुलकर्णी, वडनाका येथील सार्वजनिक चिपळूणचा महाराजा गणेशोत्सव मंडळ, शारदा साडी सेंटर, कविता हॅन्डलूम, जयंत साडी सेंटर, मेजर कलेक्शन, माजी सभापती पूजा निकम आदींच्या सहकार्याने ही मदत उपलब्ध करून दिली.

RELATED ARTICLES

Most Popular