25.6 C
Ratnagiri
Tuesday, September 17, 2024

परप्रांतीय हायस्पिड ट्रॉलरच्या घुसघोरीला चाप – मत्स्य विभाग

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी हद्दीमध्ये मोठ्या...

पूर नियंत्रणासाठी लवकरच बैठक – खासदार नारायण राणे

चिपळुणातील पूर नियंत्रणावर मोठे काम करायचे आहे....

रत्नागिरी रेल्वेस्थानकाचे बदलतेय रूपडे…

कोकण रेल्वेमार्गावरील प्रमुख रेल्वेस्थानकांचे रूपडे बदलत आहे....
HomeMaharashtraमुंबईत गेल्या १० वर्षांतील सर्वाधिक तापमानाची नोंद

मुंबईत गेल्या १० वर्षांतील सर्वाधिक तापमानाची नोंद

राज्यामध्ये उष्माघाताच्या रुग्णांची संख्या ८२ वर पोहोचली आहे.

उन्हाचा चटका, गरम हवेच्या झळा, उकाडयामुळे होणारी काहिली बुधवारीही कायम होती. मुंबईत गेल्या १० वर्षांतील एप्रिल महिन्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद मंगळवारी झाली. सांताक्रूझ केंद्रावर सरासरी ३९.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली असून ठाण्यात सरासरी ४२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. दरम्यान, राज्यभरात उष्णतेच्या लाटेने लोकं हैराण झाले असून उष्माघाताचे ८२ रुग्ण आढळले आहेत.

मुंबईत गेल्या १० वर्षांतील एप्रिलमधील सर्वाधिक उष्ण दिवसाची नोंद मंगळवारी झाली. मुंबईत मंगळवारी कमाल तापमान चार अंशानी अधिक नोंदले गेले. यापूर्वी २२ एप्रिल रोजी ३९ अंश कमाल तापमानाची नोंद करण्यात आली होती. तो विक्रम मंगळवारी मोडीत निघाला. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात मंगळवारी ३५.२ अंश सेल्सिअस कम ाल तापमानाची नोंद झाली. हे तापम रान सरासरीपेक्षा ३ अंशानी अधिक होते. सांताक्रूझ केंद्रातील तापमानही सरासरीपेक्षा ६ अंशानी अधिक होते.

जळगावमध्ये सर्वाधिक तापमान – राज्यात मंगळवारी सर्वाधिक तापमान (४२.४) जळगाव येथे नोंदवले गेले. त्याखालोखाल ठाणे- बेलापूर केंद्रात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. दरम्यान, मुंबईसह, ठाणे, रायगड येथे उष्णतेची लाट कायम असेल मात्र त्याची तीव्रता कमी असेल. तसेच कोकणातील काही भागात उष्णतेची लाट जाणवण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. त्यानंतर पुढील दोन तीन दिवसानंतर तापमानात आणखी २ ते ३ अंशानी घट जाणवू शकेल असेही स्पष्ट केले आहे.

उष्माघाताचे पाच नवे रुग्ण – राज्यामध्ये उष्माघाताच्या रुग्णांची संख्या ८२ वर पोहोचली आहे. तीन दिवसांमध्ये राज्यात उष्माघाताचे पाच नवे रुग्ण सापडले आहेत. यामध्ये धुळयामधील तीन तर ठाणे व सोलापूरमधील प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. १ मार्च ते १२ एप्रिल या ४२ दिवसांमध्ये राज्यात उष्माघाताचे ७७ रुग्ण आढळून आले होते.

RELATED ARTICLES

Most Popular