27 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे कमावण्याचे आमिष दाखवुन फसवणूक

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे मिळवून देण्याचे...
HomeChiplunचिपळुणात नारायण राणेंचा दोन दिवस मुक्काम

चिपळुणात नारायण राणेंचा दोन दिवस मुक्काम

अनेक भेटीमुळे चिपळूणातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.

महायुतीच्या मेळाव्या निमित्ताने चिपळूणमध्ये आलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी येथे दोन दिवस मुक्काम ठोकला होता. यावेळी त्यांनी चिपळूणचे कुलदैवत जुना भैरी मंदिरात जाऊन सहकुटुंब दर्शन घेतले. त्याचबरोबर काही महत्वाच्या गाठीभेटी देखील घेतल्या. ना. दादांनी प्रथमच अशा प्रकारच्या गाठीभेटी घेतल्याने बाजकीय वर्तुळात या विषयाची मोठी चर्चा ऐकण्यास मिळत आहे. सोमवारी सकाळी ना. राणे चिपळूणमध्ये दाखल झाले. यावेळी प्रथम त्यांनी ग्रामीण भागातील महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा पेढांबे येथे घेतला. त्यानंतर सायंकाळी चिपळूण शहरातील राधताई लाड सभागृहात शहराचा मेळावा पार पडला.

या मेळाव्यांना चांगला प्रतिसाद देखील मिळाला होता. मेळाव्यांतर ना. दादांनी चिपळूणातच मुक्काम ठोकल्याची माहिती मिळत आहे. सोमवारीच त्यांनी चिपळूण मधील व्यापाऱ्यांची भेट घेतली. त्यांच्या समस्या जाणून घेऊन सोडवण्याचे वचन त्यांनी व्यापाऱ्यांना दिले. या दौऱ्यादरम्यान त्यांनी चिपळूण नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांची भेट घेतली. तसेच चिपळूणचे तरुण उद्योजक प्रशांत यादव यांनी उभारलेल्या वशिष्ठ दूध प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. तसेच या प्रकल्पाचे तोंड भरून कौतुक देखील केले.

कोकणात अशा प्रकारचा मोठा प्रकल्प उभारण्याचे धाडस प्रशांत यादव यांनी दाखवल्याबद्दल यादव दाम्पत्याचे देखील त्यांनी कौतुक केले. त्यानंतर चिपळूण तसेच सावर्डे येथील अनेकांच्या त्यांनी भेटीगाठी घेऊन चर्चा देखील केली. आता या भेटी राजकीय होत्या का? लोकसभा निवडणुकांच्या संदर्भात त्यांनी काही चर्चा केली का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. निलेश राणे २००९ मध्ये येथून निवडून गेले होते.

त्यांच्या कार्यकाळांत चिपळूणमध्ये निलेश राणे यांनी सर्वाधिक लक्ष दिले होते. त्यामुळे येथील राजकीय परिस्थिती व मतांच्या आकडेवारीची परिपूर्ण माहिती निलेश राणे यांच्याकडे आहे. या अनुषंगानेच ना. दादांनी या भेटीगाठी घेऊन आपण उमेदवार असल्याचे सूचक संकेत दिले असावेत अशीही चर्चा ऐकण्यास मिळत आहे. मात्र त्यांच्या भेटीमुळे चिपळूणातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.

दौऱ्यात शिंदे गटाने पाठफिरवली – चिपळूणात झालेल्या महायुतीच्या दोन्ही मेळाव्याकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सपशेल पाठ फिरवल्याचे दिसून आले.उपनेते माजी आमदार सदानंद चव्हाण तसेच तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, युवासेना, महिला आघाडी असे कोणतेही पदाधिकारी उपस्थित नव्हते. त्याची मोठी चर्चा चिपळूणात सुरू आहे.

RELATED ARTICLES

Most Popular