31.2 C
Ratnagiri
Thursday, February 13, 2025

पाच लाख ३६ हजार लाभार्थ्यांना ‘गोल्डन कार्ड’ – जनआरोग्य योजना

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा...

शिवभोजन थाळी योजनेला घरघर, केंद्रे पडली बंद

गरीब मजूर, कामगारांची उपासमार टाळण्यासाठी शासनाने अवघ्या...

बिले रखडल्याने चिपळुणात ठेकेदारांची बांधकाम कार्यालयावर धडक

ठेकेदारांच्या थकीत देयकांसंदर्भात येथील ठेकेदारांनी सार्वजनिक बांधकाम...
HomeKhedभोस्ते घाटातील अवघड वळणावर महामार्ग खचला

भोस्ते घाटातील अवघड वळणावर महामार्ग खचला

संरक्षण भिंतीसह महामार्गाचा काही भाग दरीत कोसळण्याची भीती आहे.

मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये भोस्ते घाटातील अवघड वळणावर महामार्ग खचला असून महामार्ग आणि संरक्षण भिंतीच्या दरम्यान जमिनीला अडीच ते तीन फुट खोल भेगा गेल्या आहेत. संरक्षण भिंत देखील खचून गेली आहे, भिंत केव्हाही कोसळण्याची भीती प्रवाशांकडून व्यक्त होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील भोस्ते घाट अपघात प्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाते, अनेक अपघात यापूर्वी याच वळणावर झाले आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूने वेगाच्या मयदिसाठी स्पीड ब्रेकर्स टाकण्यात आले आहेत, पण पहिल्याच पावसात भोस्ते घाट खचल्याने भीती व्यक्त होत आहे.

पावसाचा जोर वाढल्यास भेगा आणखी वाढून संरक्षण भिंतीसह महामार्गाचा काही भाग दरीत कोसळण्याची भीती आहे. भोस्ते घाटातील अवघड वळणावर महामार्ग खचल्यामुळे संरक्षण भिंतीसह महामार्गाचा भाग खोलदरीत कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. चिपळूण शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे अद्याप काम चालू आहे, त्यामुळे शहरातील महामार्गाची ही दुरावस्था झाली असून काही ठिकाणी नदीच स्वरूप आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular