26.6 C
Ratnagiri
Wednesday, July 16, 2025

कशेडीत लोखंडी जाळ्यांचे ‘सुरक्षा कवच’

मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवाशांसाठी कायमची डोकेदुखी ठरलेल्या कशेडी...

धनुष्यबाण कुणाचा? निवडणुकांपूर्वी उध्दव ठाकरेंना मिळणार कौल?

१० दिवसांपूर्वी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे...

सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होताच काहीजण आनंदित, अनेकांचा हीरमोड

जिल्हयात सोमवारी सरपंचपदाच्या आरक्षणाची लॉटरी निघाली. त्यानंतर...
HomeRatnagiriसाखरप्यात तरुणावर बिबट्याचा हल्ला सलग दुसरी घटना

साखरप्यात तरुणावर बिबट्याचा हल्ला सलग दुसरी घटना

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब पिंजरा लावून वाघाला पकडण्याची मागणी होत आहे.

साखरपा जाधववाडी येथे भर वस्तीत सकाळच्या वेळी घरगुती काम करणाऱ्या तरुणावर बिबट्याने हल्ला केला. यात हा तरुण गंभीर जखमी झालेला आहे. हाताला व डोक्याला या तरुणाच्या बिबट्याने हल्ला केल्याने गंभीर जखमी झालेला आहे. अचानक झालेल्या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब पिंजरा लावून वाघाला पकडण्याची मागणी होत आहे. यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. जखमीला साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे प्राथमिक उपचार करून रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे, अमित जाधव असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

दोन दिवसापूर्वीच साखरपा जाधववाडी येथील लिंगायत नामक महिलेवर बिबट्याच्या हल्यात जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच ही दुसरी घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी घटना घडताच माजी सभापती जया माने यांनी रुग्णालयात जाऊन जखमी जाधव याची पाहणी केली. त्यांनी वन अधिकारी यांना संपर्क करून चांगलेच धारेवर धरले. सलग दुसरी घटना असल्याने याचा बंदोबस्त ताबडतोब व्हावा अशी मागणी केली. त्यामुळे ताबडतोब साखरपा जाधववाडी या ठिकाणी बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पुढील कार्यवाही होणार असल्याचे वनविभागाने सांगितले. त्याचबरोबर वनअधिकारी तौफिक मुल्ला यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे येऊन जखमी अमित जाधव याची पाहणी केली.

डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याने त्याला रत्नागिरी येथे हलविण्यात आले. त्यावेळी उपचारासाठी होणारा सर्व खर्च शासनाकडे होणार असल्याचे वनअधिकारी मुल्ला यांनी सांगितले. नेहमीप्रमाणे आपल्या नवीन घराच्या बांधकामावावर पाणी घालण्यासाठी अमित जाधव गेला होता. त्यावेळी आतमध्ये आडोशाला वसलेल्या बिबट्याने अमित जाधव याच्यावर झडप घातली. यावेळी त्याच्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली व त्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी त्याला दवाखान्यात आणले. भरदिवसा झालेल्या हल्लूयाने ग्रामस्थ भयभीत झालेले आहेत. त्यामुळे वनविभाग कशी कार्यवाही करते हे पाहणे महत्वाचे आहे. दरम्यानं गुरववाडी याठिकाणी सिसिटीव्ही लावण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular