27.2 C
Ratnagiri
Thursday, June 13, 2024

पाकिस्तान सामना न खेळताच T20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडणार….

आधीच संकटात सापडलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघावर संकट...

पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस सोडणार

पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी वारकरी दरवर्षी 'विठू नामाचा...

शैक्षणिक साहित्याच्या दरात पंधरा टक्क्यांनी वाढ

शहरी व ग्रामीण भागातील शाळा सुरू होण्यासाठी...
HomeRatnagiri"सीटीबी" तंत्राद्वारे महामार्ग दुरुस्ती, गणेशभक्तांचा प्रवास होणार सुखकर

“सीटीबी” तंत्राद्वारे महामार्ग दुरुस्ती, गणेशभक्तांचा प्रवास होणार सुखकर

१५ ऑगस्टनंतर या तंत्राचा वापर करून या कामास सुरवात होणार आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर होणार आहे. जिल्ह्यातील आरवली ते वाकेड या ९० किलोमीटर अंतरातील खड्डे आणि मोठे पॅचवर्कचे काम करण्यासाठी जोरदार हालचाली महामार्ग विभागाकडून सुरू आहेत. पनवेल-इंदापूर विभागाप्रमाणेच रत्नागिरी विभागातही सिमेंट ट्रिटेड बेस (सीटीबी) तंत्राद्वारे रस्ते दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. १५ ऑगस्टनंतर या तंत्राचा वापर करून या कामास सुरवात होणार आहे. महामार्ग विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला. कोकणवासीयांना दिलासा देण्याच्या दृष्टीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण वारंवार बैठका घेत असून, महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत.

गेल्या चौदा वर्षांपासून सुरू असलेले मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे दरवर्षीचा पावसाळा आणि त्यानंतर महामार्गाला पडणारे भले मोठे खड्डे आणि त्याची होणारी मलमपट्टी, ही आता नेहमीचीच बनली आहे; मात्र यावेळी गणेशोत्सवाला कोकणात येणाऱ्या मुंबईकर गणेशभक्तांना दिलासा मिळणार आहे. प्रवास करताना धक्के कमी बसतील अशी व्यवस्था शासनाकडून केली जात आहे. महामार्गावरील १८० किलोमीटर अंतरातील खड्डे बुजविण्याचे आणि मोठे पॅच मारण्याचे काम येत्या १५ ऑगस्टनंतर सुरू होणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.

आता मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल ते इंदापूर भागातील ९० किलोमीटर अंतरात असलेले खड्डे, तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील आरवली ते वाकेड या ९० किलोमीटर अंतरातील खड्डे आणि मोठे पॅच यांचे काम करण्यासाठी जोरदार हालचाली महामार्ग विभागाकडून सुरू झाल्या आहेत. पनवेल-इंदापूर विभागाप्रमाणेच रत्नागिरी विभागातही सीटीबी तंत्राद्वारे रस्ता दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. याबाबत महत्त्वाची बैठक झाल्याचे महामार्ग विभागाच्या सूत्रांनी सांगितले. आरवली ते कांटे आणि कांटे ते वाकेड-लांजा या दोन टप्प्यांतील ९० किलोमीटर महामार्गावर अस्तित्वात असलेल्या जुन्या मार्गांची स्थिती भयावह आहे.आरवली भागात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. निवळी ते हातखंबा भागात खड्ड्यांमुळे महामार्गाची चाळण झाली आहे. हातखंबा ते पालीपर्यंत रस्ता आणखीनच खराब झाला आहे. पाली बाजारपेठेतील ५०० मीटर रस्ता पूर्णच बाद झालेला असून, तेथे ५०० मीटर लांबीचा मोठा पॅच मारावा लागणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular