26.1 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeMaharashtraहिंदुस्तानी भाऊला हायकोर्टानं सुनावले खडे बोल, परंतु तूर्तास दिलासा

हिंदुस्तानी भाऊला हायकोर्टानं सुनावले खडे बोल, परंतु तूर्तास दिलासा

विकास पाठक याने सोशल मीडियावर टाकलेल्या एका पोस्टवरून त्याच मागणीसाठी अनेक विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि आंदोलन सुरू केले.

मुंबई उच्च न्यायालयानं विकास पाठक उर्फ हिंदुस्तानी भाऊला तूर्तास दिलासा दिला आहे. मुंबई पोलिसांच्या विनंतीवरून विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांनी विकास पाठक विरोधात सुरू केलेल्या ‘प्रतिबंधात्मक कारवाई’ अंतर्गत तूर्तास कोणतेही आदेश न देण्याचे निर्देश हायकोर्टानं जारी केले आहेत.

राज्यातील दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन घेण्यात याव्यात या विकास पाठक याने सोशल मीडियावर टाकलेल्या एका पोस्टवरून त्याच मागणीसाठी अनेक विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि आंदोलन सुरू केले. मुंबईतही शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर मोठ्या संख्येत विद्यार्थी एकवटले आणि परीक्षा रद्द करा नाहीतर ऑनलाईन घ्या अशा घोषणा देत आंदोलन सुरू केले.

विद्यार्थ्यांच्या या अचानक केलेल्या आंदोलनामुळे एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी त्यामागे कोणाचा हाथ आहे हे काही वेळातच शोधून काढले आणि कारवाईचा बडगा उगारत विकास पाठक याला १ फेब्रुवारी रोजी अटक केली होती.

दहावी आणि बारावीत शिकत असणारी मुले १६-१७  वर्षांची ही मुलं मनाने भाबडी असतात. सोशल मीडियाच्या या वेगवान युगात चटकन एखाद्याच्या बोलण्याचा प्रभाव या तरुणाइवर होतो. सोशल मीडियावर प्रभुत्व असलेल्या सेलिब्रिटिंनी थोडं भौतिक जबाबदारीच भान ठेवून वागायला हवं. आपल्या बोलण्याचा आणि कृत्याचा काय परिणाम होईल याचा प्रथम गंभीरतेने विचार करायला हवा.

काही वर्षांपूर्वी दिल्ली, आझाद मैदान इथं घडलेल्या घटनांवरून योग्य तो बोध घ्यायला हवा. अशा परखड शब्दांत हायकोर्टानं हिंदुस्तानी भाऊचे कान चांगलेच उपटले आहेत. तसेच या १६-१७ वर्षांच्या कोवळ्या विद्यार्थ्यांच्या डोक्यात आंदोलनाचे खूळ भरवून दिल्याबद्दल, एवढे आंदोलन घडून आले. या मुलांची डोकी का भडकावली! असा सवाल उपस्थित करत विकास पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊला हायकोर्टानं खडे बोल सुनावले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular