26.1 C
Ratnagiri
Thursday, August 7, 2025

गणेशोत्सव कालावधीत रेल्वेप्रवासात मिळणार आता उकडीचे मोदक

गणरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या प्रवाशांना वंदे भारत आणि...

पुनर्वसन वसाहत की, कचऱ्याचे डम्पिंग ग्राऊंड

मुंबई-गोवा महामार्गावर कोदवली ग्रामपंचायतीच्या हद्दीत पुनर्वसन वसाहत...

महाविकास आघाडीचा महावितरण अधिकाऱ्यांना सज्जड इशारा

दिवसात अनेकवेळा लाईट जात आहे.... तरीपण अवाच्यासवा...
HomeMaharashtraदोन वर्षाने न्याय, हिंगणघाट जळीत प्रकरणात आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

दोन वर्षाने न्याय, हिंगणघाट जळीत प्रकरणात आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

बरोबर दोन वर्षांनी त्याच तारखेला या पिडीतेच्या गुन्हेगाराला शिक्षा मिळाली.

हिंगणघाट येथे थरकाप उडवणारी घटना १० फेब्रुवारी २०२० रोजी नागपूर येथे घडली होती. जळीत प्रकरणात मृत्यूशी झुंज देणाऱ्या प्राध्यापिका अंकिता अरुण पिसुड्डे हिला भरचौकात पेट्रोल टाकून जाळून  मारण्यात आले. या जळीत प्रकरणातील नराधम आरोपी विकेश उर्फ विक्की नगराळे याचा गुन्हा सिद्ध झाला.

हिंगणघाटच्या भर बाजारातील गर्दीच्या चौकात घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. घटनेचे राज्यात अनेक ठिकाणी पडसाद उमटले. घडलेली घटना अशी कि, पीडित महिला ही महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत होती. पीडिता ३ फेब्रुवारीला २०२०  ला सकाळी आपल्या घरातून बसने हिंगणघाटला पोहचली.

नंदोरी चौकातून कॉलेजच्या दिशेने जातांना आरोपी विकेश नगराळे तिथेच दबा धरून बसला होता. प्राध्यापिका दिसताच विकेशने अगोदरच दुचाकीतील काढलेले पेट्रोल तिच्यावर ओतले आणि तिला पेटवून टाकले. यात गंभीररीत्या भाजलेल्या पीडितेवर नागपूरातील ऑरेंजसिटी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू झाले. मात्र आठवडाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर १० फेब्रुवारीला तिने अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला आणि बरोबर दोन वर्षांनी त्याच तारखेला या पिडीतेच्या गुन्हेगाराला शिक्षा मिळाली.

या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच संतापाची लाट उठली होती. महिलांच्या सुरक्षिते बद्दल पुन्हा प्रश्न उभा राहिला होता. या प्रकरणात महिला तपासी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव यांनी कार्यालयीन कामकाजाच्या १९ दिवसांत दोषारोप पत्र पूर्ण केले. शिवाय, २८ फेब्रुवारीला या प्रकरणातील आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याच्या विरुद्ध तब्बल ४२६ पानांचे दोषारोपपत्र हिंगणघाटच्या प्रथम श्रेणी न्यायालयात दाखल केले होते. न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अंतिम सुनावणीवेळी सरकारी पक्षाची बाजू मांडताना आज अ‍ॅड. उज्जवल निकम यांनी अनेक दाखले दिले.

RELATED ARTICLES

Most Popular