21.8 C
Ratnagiri
Friday, January 3, 2025

मी बाळासाहेबांचा शिवसैनिक ! राजन साळवी

'सरकार बदलले आणि मला दिलेली वाय प्लस...

मुंबईकर महिलांचा जबरदस्त पराक्रम स्थानिक व्यापाऱ्याला खरपूस चोप!

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाचे स्वागत...

पालकमंत्रीपदासाठी जोरदार रस्सीखेच रत्नागिरीत सामंत X कदमांमध्ये चुरस?

२३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर...
HomeSportsऐतिहासिक विजय, तब्बल ७३ वर्षांनंतर थॉमस कप भारतात

ऐतिहासिक विजय, तब्बल ७३ वर्षांनंतर थॉमस कप भारतात

१४ वेळा अजिंक्यपद जिंकलेल्या इंडोनेशिया संघाला ३-० असे नमवून भारताने मिळवलेला विजय नक्कीच ऐतिहासिक आहे.

भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने तब्बल ७३ वर्षांनंतर थॉमस कप स्पर्धेच्या अंतिम फेरी जिंकून इतिहास घडवला आहे. १४ वेळा अजिंक्यपद जिंकलेल्या इंडोनेशिया संघाला ३-० असे नमवून भारताने मिळवलेला विजय नक्कीच ऐतिहासिक आहे. भारतीय क्रीडा जगतात या विजयामुळे भारतीय बॅडमिंटन क्षेत्राची मान उंचावली आहे.

पुरुष एकेरीतील विजेते लक्ष्य सेन आणि किदम्बी श्रीकांत, तसंच दुहेरी सामन्यातील विजेते सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या खेळाडूंचे खुप खुप अभिनंदन. तुमच्या कामगिरीनं देशवासियांना अवर्णनीय आनंद दिला आहे. भारत हा थॉमस कप जेतेपद पटकावणारा सहावा देश ठरला आहे. यापूर्वी देखील केवळ ५ देशांनाच या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावणे शक्य झाले होते.

सर्वच भारतीय बालपणीपासून बॅडमिंटन हा खेळ अगदी मुलं-मुली देखील खेळताना दिसतात. पण याच खेळाची एक भव्य स्पर्धा असणाऱ्या थॉमस कपमध्ये मात्र भारताला इतक्या वर्षात विजय मिळवणं तर दूरचं. परंतु, अंतिम सामन्यापर्यंत देखील पोहोचता आलं नव्हतं. तब्बल ७३ वर्षांनंतर प्रथमच थॉमस कपमध्ये अंतिम सामना खेळणं ही भारतासाठी फार मोठी गोष्ट होती. सेमी फायनलमध्ये डेन्मार्क संघाला नमवत भारताच्या पुरुष बॅडमिंटन संघाने अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवला. ज्यानंतर आता पहिले तीन सामने जिंकत कपही मिळविला आहे.

उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी थॉमस कप विजेत्या भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाचं “तुमचं यश हे भारतीय बॅडमिंटनच्या सुवर्णयुगाची सुरुवात आहे, तुमच्या यशाचा देशाला अभिमान आहे.” अशा शब्दात अभिनंदन केलं आहे.

RELATED ARTICLES

Most Popular