27.8 C
Ratnagiri
Tuesday, July 23, 2024

… म्हणून सूर्यकुमार कर्णधार, अध्यक्ष आगकर यांनी जाहीर केली भूमिका

प्रत्येक सामन्यास उपलब्ध राहील, असा खेळाडू कर्णधार...

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्टच आपला दावा खरा ठरलाः वैभव खेडेकर

मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट होत...

रिक्त जागी मानधनावर शिक्षकांची नियुक्ती करा – संघटनेची मागणी

जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त जागांवर स्थानिक...
HomeChiplunहिट अँड रन कायदा रद्द झालाच पाहिजे, चिपळुणात उत्स्फूर्त मोर्चा

हिट अँड रन कायदा रद्द झालाच पाहिजे, चिपळुणात उत्स्फूर्त मोर्चा

मोर्चेकऱ्यांनी आपल्या संतप्त भावनांचे निवेदन प्रांताधिकारी यांना दिले.

हिट अँड रन कायदा रद्द झालाच पाहिजे, कोण म्हणतो करणार नाय केल्या शिवाय गप्प बसणार नाय, रिक्षा संघटनेचा विजय असो… आशा गगनभेदी घोषणा देत फलक फडकवत बुधवारी हजारो रिक्षा व्यावसायिक चिपळुणात रस्त्यावर उतरले होते. कडकडीत बंद आणि उस्फूर्त निघालेल्या मोर्चातून या कायद्या विरोधातील संताप व्यक्त होत होता. मोर्चेकऱ्यांनी आपल्या संतप्त भावनांचे निवेदन प्रांताधिकारी यांना दिले.

चिपळुणात भव्य मोर्चा – हिट अँड रन कायद्या विरोधात चिपळूण, गुहागर तालुक्यातील रिक्षा संघटनांनी बुधवारी भव्य मोर्चा काढला. रिक्षा संघटनेचे नेते राजापूर संघटना सचिव संतोष सातोशे, दिलीप खेतले, विलास उर्फ अप्पा सकपाळ, अनंत मोरे, रामदास भोजने, प्रशांत गोरीवले, संजय जोशी, रवींद्र घाडगे, संजय गमरे, पोरोश मुरकर, सचिन हातीसकर, नरेंश पालकर, प्रशांत यादव, जितेंद्र सुर्वे, जितेंद्र राऊत, अंकुश नागवेकर, महेंद्र महाडिक, विठ्ठल दाते यांच्या पुढाकाराने भव्य मोर्चा चिपळूण नगरपालिका ते प्रांताधिकारी कार्यालय असा निघाला.

जोरदार घोषणाबाजी – हिट अँड रन कायदा रद्द रद्द करा, रिक्षा चालक मालक संघटनेचा विजय असो, कोण म्हणतो रद्द करणार नाही, .. केल्याशिवाय राहणार नाही… आशा गगनभेदी घोषणा देत कायदा रद्द करण्याचे फलक फडकवत मोर्चा निघाला होता. रिक्षा संघटनेचे हजारो सदस्य रस्त्यावर उतरले होते. रिक्षा संघटनेची ताकद साऱ्या जिल्हावासीयांना पहावयास मिळाले, एवढा दणदणीत मोर्चा आज चिपळूणमध्ये निघाला.

प्रांताधिकाऱ्यांना निवेदन – हजारो संख्येने रिक्षा व्यावसायिकांनी आपल्या संतप्त भावनांचे निवेदन प्रांताधिकारी आकाश लिंगाडे यांना दिले. यावेळी प्रांताधिकारी श्री. लिंगाडे यांनी आपल्या भावना शासनापर्यंत पोहचवू, असे स्पष्ट केले. यावेळी रिक्षा संघटना आणि मालवाहतूक संघटनेचे पदाधिकारी यांनी प्रांताधिकारी यांच्या सोबत चर्चा केली. यावेळी डीवायएसपी श्री. राजम ाने उपस्थित होते. पोलिसांनीही मोठा बंदोबस्त ठेवला होता.

कडकडीत बंद – शहरातील व अन्य विभागातील सर्व रिक्षा स्टॉप मालवाहतुकदार, स्कुल बस अन्य वाहतूक व्यावसायिक, रिक्षा गॅरेज संघटना सहभागी होत कडकडीत बंद पुकारण्यात आला होता. आजचा बंद उस्फुर्तपणे करण्यात आला होता. कधी नव्हे एवढा कडकडीत बंद शहरासह ग्रामीण भागात करण्यात आला. प्रवाशी वर्गानेही आजच्या बंदला कोणतीही नाराजी व्यक्त न करता पाठींबा दिला आहे.

पुढाऱ्यांबाबत नाराजी – यावेळी रिक्षा संघटनेचे नेते राजापूर संघटनेचे पदाधिकारी संतोष सातोशे यांनी राजकारण्यांना चांगलाच टोला लगावला. आठ नऊ महिने आम्ही झगडत आहोत. मात्र आजपर्यंत कोणीही राजकारणी आमच्या व्यथा जाणून घेण्यास आले नाहीत असे सांगत राजकीय पुढाऱ्यांबाबत नाराजी व्यक्त केली. सतोशे यांनी भावना व्यक्त करताच मोर्चेकऱ्यांनी जोरदार टाळ्या आणि घोषणा देत दाद दिली.

आक्रमक भूमिका घेण्याचा इशारा – राष्ट्रवादीचे नेते शौकतभाई मुकादम, शिवसेनेचे बाळा कदम, विनोद झगडे, शशिकांत मोदी राष्ट्रवादीचे दशरथ दाभोलकर, मुराद अडरेकर आदी या मोर्ध्यात सहभागी झाले होते. यावेळी शौकतभाई मुकादम यांनी, मी तुमच्या सोबत आहे. वेळ आली तर याविरोधात तीव्र लढा उभारू. त्यामध्ये आपण आक्रमक भूमिका घेईन, आशा शब्दात आपला पाठींबा व्यक्त केला. यावेळी दिलीप खेतले यांनी स्पष्ट केले की हा कायदा रद्द होणे गरजेचे आहे. आम्ही आज शांततेच्या मार्गाने आंदोलन केले. मात्र जर कायदा रद्द झाला नाही तर मग आक्रमक आंदोलन आम्हाला करावे लागेल. संपूर्ण जिल्ह्यात याचे पडसाद उमटतील, असा इशारा यावेळी दिला.

RELATED ARTICLES

Most Popular