देशभरामध्ये होळीचा सण मोठ्या उत्साहाने थाटामाटात साजरा केला जातो. अर्थातच गेल्या वर्षीपासून सुरु झालेल्या कोरोनाच्या संकटामुळे यंदाच्या वर्षीच्या होळीच्या उत्सवामध्येही सावट आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता, शासनाने सार्वजनिकरित्या बंदी घातली असली तरी प्रत्येक घरामध्ये सुरक्षितपणे होळीचा सण साजरा करण्यासाठी जोरदार तयारी करत आहेत. होलिका दहनाच्या दिवशी असे म्हणले जाते की, या दिवशी वाईटावर चांगल्याचा विजय होतो.
होळीबाबत लोकांमध्ये वातावरण खूप आनंद आणि उत्साह आहे. दरम्यान, या कोरोना संक्रमाणामुळे लोक अधिक सतर्क झाल्याचे दिसून येत आहे. देशाच्या अनेक भागात होम पेटवण्याची तयारी सुरू झाली आहे. यानिमित्ताने लोकांची जास्त गर्दी होणार नाही याची सुद्धा खबरदारी घेतली गेली आहे. या दिवशी शाही स्नान आणि दान करण्यास योग्य दिवस मानला जातो. दरवर्षी होळीच्या एक दिवस आधी होलिका मातेची विधिवत पूजा करून, पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करून, सुख-शांती आणि यशासाठी प्रार्थना केली जाते. या दिवशी कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करु शकता. तसेच रखडलेले कामही पुन्हा सुरू करता येईल. आपल्या मनातील वाईट विचार होळीप्रमाणे आगीत जाळून नष्ट व्हावेत या गोष्टीचे होळी हे प्रतीक आहेत.
तसेच नकारात्मकता नष्ट होऊन त्यामुळे आपले मन स्वच्छ निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते. होळीच्या दुसर्या दिवसापासून वसंतोत्सवाला आरंभ होतो. या आनंदामध्ये सुकलेली पाने आणि सुकी लाकडे एकत्र करून जाळणे हाच होळीचा उद्देश असतो. दुसर्या दिवशी होळीच्या अग्नीत गव्हांच्या लोंब्या भाजण्याची देखील काही ठिकाणी प्रथा आहे. कदाचित या दिवसामध्ये गव्हाचे पीक तयार होत असल्याने त्यामागील कारण हेही असू शकते. नवीन पीक प्रथम अग्नी देवतेला अर्पण करण्याची प्रथा आहे.
होळीच्या दुसर्या दिवशी धुळवड साजरी केली जातो. सर्वजण एकत्र येऊन गुलाल खेळणे, विविध रंगांची उधळण करणे, बंधूभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणजे हा होळी सण. लोक या दिवशी आपापसातील भेदभाव, भांडण, गरिबी-श्रीमंती विसरून एकत्र धुळवड खेळतात. तसेच वातावरणामध्ये होणारा बदल जाणवून सुद्धा थंडीची लहर संपुष्टात येऊन, उष्म्याचा दाह झेलण्याचा ऋतू सुरु झाला. यानंतर येणारी रंगपंचमी सुद्धा सृष्टीमधील विविध रंग दर्शवणारी ठरते.