27 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे कमावण्याचे आमिष दाखवुन फसवणूक

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे मिळवून देण्याचे...
HomeMaharashtraदहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाईन कि ऑफलाईन

दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाईन कि ऑफलाईन

दहावी-बारावीच्या तोंडावर आलेल्या परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन याबाबत विद्यार्थी आणि पालकांमधील संभ्रम निर्माण होत होता, परंतु आत्ता मात्र तो दूर करत महाराष्ट्र बोर्डाने यावर निर्णय जाहीर केला आहे.

राज्यात वाढत असलेले कोरोनाचे प्रमाण पाहता पुन्हा एकदा लॉकडाऊन करावे लागते कि, काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव अनेक जिल्ह्यांमध्ये वाढतचं चालला आहे.काही ठिकाणी नाईट कर्फ्यूचे आदेश सुद्धा जरी केले गेले आहेत. त्यातच पुढील महिन्यापासून सुरु होणार्या १० वी व १२ वी च्या बोर्ड परीक्षा कशा घ्यायच्या! पुढच्या महिन्यापासून दहावी आणि बारावीच्या अंतर्गत गुणांसाठी प्रॅक्टिकल परीक्षेला सुरुवात करणे आवश्यक आहे. परंतु, मागच्या मार्च महिन्यापासून सुरु असलेल्या कोरोनाच्या धुमाकुळामुळे शालेय शिक्षण विभागाने १० वी आणि १२ वीच्या परीक्षांसंदर्भात आढावा घेतला. अशावेळी दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन म्हणजेच प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर जाऊन देणे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने योग्य ठरू शकते का? परीक्षा ऑनलाईन घेता येण शक्य आहे का? अशी चर्चा स्थानिक स्तरावरसुद्धा करण्यात आली. त्यावेळी दहावी, बारावीच्या परीक्षांची तयारी पूर्ण झाली आहे असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आणि जर परीक्षा ऑनलाईन घेतली, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंटरनेट सुविधेच्या अभावामुळे फटका बसू शकतो. त्यामुळे परीक्षा घ्यायची असेल तर ती ऑफलाईनच घेतली जाईल. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर येऊनच परीक्षा द्यावी लागणार अशी शिक्षण विभागाने सांगितले. राज्यात दहावीचे एकूण १६ लाख विद्यार्थी आणि बारावीचे १४ लाख परीक्षार्थी प्रविष्ट आहेत. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहून सध्य स्थितीला तरी दहावी आणि बारावी परीक्षांच्या तारखांमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही आणि कोरोनाचे स्वरूप पाहूनच नंतरच परीक्षांच्या तारखां संदर्भातील आवश्यक निर्णय घेतले जातील. परंतु, परीक्षा या मुख्यत: ऑफलाईनच घेतल्या गेल्या पाहिजेत, अशी ठाम भूमिका शिक्षण विभागानं घेतली आहे.

SSC exams in maharashtra

त्याचप्रमाणे ऑनलाईन परीक्षा घेण्यास बोर्ड तसेच ग्रामीण आणि शहरी भाग सुद्धा सध्या अनुकूल नसल्याने सद्य स्थितीत ऑनलाईन परीक्षा घेणे शक्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागानं घेतलेला हा निर्णय असून दहावी बारावी परीक्षां संदर्भात शालेय शिक्षण विभागाद्वारे सुद्धा स्थानिक स्तरावर आढावा घेण्यात आला आहे. १० वी आणि १२ वीच्या परीक्षा आता ऑफलाईनचं घेण्याची शक्यता दाट आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्याचे मुख्यमंत्री वारंवार गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा तसेच सोशल डिस्टंसिंग बाळगा, तसेच कोरोना बद्दलचे नियम पाळा असे सांगत आहेत.

दहावी-बारावीच्या तोंडावर आलेल्या परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन याबाबत विद्यार्थी आणि पालकांमधील संभ्रम निर्माण होत होता, परंतु आत्ता मात्र तो दूर करत महाराष्ट्र बोर्डाने यावर निर्णय जाहीर केला आहे. महाराष्ट्र बोर्डाने १० वी आणि १२ वीच्या परीक्षा या ऑफलाईन पद्धतीनेच होतील असा निर्णय जाहीर केला आहे. बोर्डाचे अधिकृत संकेतस्थळ असलेले www.mahahsscboard.in यावरून परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. यावर्षी १२ वीची परीक्षा २३ एप्रिल पासून सुरू होत असून शेवटचा पेपर २१ मे रोजी असेल, तर १० वीची परीक्षा २९ एप्रिल ते २९ मे या ठराविक कालावधीमध्ये घेतली जाईल. तसेच १२ वीच्या परिक्षांचा निकाल जुलै महिन्याच्या अखेरीस व १० वीच्या परिक्षांचा निकाल ऑगस्ट महिन्याच्या शेवटी लागणार आहे.

HSC exams in maharashtra

मागील वर्षी मार्च महिन्यातच ओढवलेल्या कोरोना संकटामुळे १० वीच्या परीक्षेतील भूगोल विषयाचा पेपर रद्द केला गेला होता आणि वार्षिक सरासरी मार्क्सच्या आधारे निकाल देण्यात आला. तर १२ वीच्या परीक्षा फेब्रुवारी अखेरच संपल्या होत्या. पण कोरोनामुळे निकाल लागल्यला उशीर झाल्याने पुढील सार्‍याच प्रक्रिया वेळखाऊ झाली. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरेशी काळजी घेत जबाबदारीने विद्यार्थ्यांनी परीक्षांना सामोरे जाण्याचं आवाहन करण्यात आले आहे. बहुतांश पालकांमध्ये  शिक्षणमंत्र्यांच्या या निर्णयाने नाराजी पसरली आहे. गतवर्षी मार्च-एप्रिल महिन्यांतच कोरोनाने सर्वत्र शिरकाव केला, त्यामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या. आणि विद्यार्थ्यांची ऑनलाईन शिक्षण सुरु झाले. परंतु, इंटरनेटच्या अभावी ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहावे लागले. कालातराने शाळा सुरू झाल्या तरी कोरोनाच्या भीतीमुळे पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायला तयारी दाखवली नाही.

RELATED ARTICLES

Most Popular