30 C
Ratnagiri
Thursday, November 21, 2024

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...

‘या’ तारखेला जाहीर करणार CM पदाचा चेहरा! राऊतांनी अगदी वेळही सांगितली

विधानसभा निडवणुकीच्या मतदानानंतर बुधवारी समोर आलेल्या एक्झिट...
HomeRatnagiriमतदानादिवशी मतदारांना सुटी

मतदानादिवशी मतदारांना सुटी

कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुटीऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरीतीने बजावता यावा यासाठी मतदारांना मतदानाच्या दिवशी सुटी देण्यात आली असल्याचे परिपत्रक काढण्यात आले आहे. कार्यासन अधिकारी खामकांत सोनवणे यांनी हे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. भारत निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे सर्व जिल्ह्यांमध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे. या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना मतदानाचा हक्क योग्यरीतीने बजावता यावा यासाठी निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना भरपगारी सुट्टी दिली जावी.

ही सुटी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योगसमूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना इत्यादींना लागू राहील. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी आदींना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुटीऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल, याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक राहील. मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास त्यांच्याविरुद्ध योग्य कारवाई करण्यात येईल, असा इशाराही यात देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular