26 C
Ratnagiri
Saturday, September 6, 2025

एसटी प्रशासनाकडून लोकेशन अॅप’ची केवळ घोषणा

लालपरी'चे अचूक ठिकाण मोबाईलवर दिसेल, बस वेळेवर...

पीकविमा योजनेत खेड-दापोली आघाडीवर…

प्रधानमंत्री पीकविमा योजना यंदा नव्या स्वरूपात रत्नागिरी...

परतीचा प्रवास ठरला कोंडीचा… वाहनांच्या रांगा

गौरी-गणपती विसर्जनानंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास बुधवारपासून सुरू...
HomeRajapurभोंगा वाजवून देणार आपत्तीची माहिती राजापुरात पालिका प्रशासन सज्ज

भोंगा वाजवून देणार आपत्तीची माहिती राजापुरात पालिका प्रशासन सज्ज

नियंत्रण कक्ष चोवीस तास सुरू ठेवण्यात येणार आहे,

नगरपालिका प्रशासनाने संभाव्य नैसर्गिक आपत्ती कृती आराखडा तयार केला आहे. आपत्तीकाळात लोकांशी संपर्क साधण्यासाठी भोंगा वाजवण्याची यंत्रणा उभारण्यात आली आहे तसेच पूरस्थितीमध्ये अडकलेल्या लोकांना तत्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचेही नियोजन केले आहे. तसेच नियंत्रण कक्ष चोवीस तास सुरू ठेवण्यात येणार आहे, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. मुख्याधिकारी वैभव गारवे, कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना सुरू केल्या आहेत. अतिवृष्टी झाल्यास शहरातून वाहणाऱ्या अर्जुना आणि कोदवली नद्यांना दरवर्षी पावसाळ्यात पूरस्थिती असते. शहरातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत होते. बाजारपेठेसह शहरातील अनेक घरांना पुराच्या पाण्याचा अनेक दिवस सलग-कालावधीमध्ये वेढा पडलेला असतो.

दरवर्षीच्या या स्थितीमध्ये फारसा बदल झालेला नाही. त्यामुळे शहरातील संभाव्य आपत्तीला तोंड देण्यासाठी पालिका प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. आपत्काळात लोकांना सतर्क करण्यासाठी आवश्यकतेप्रमाणे भोंगा वाजवण्याचेही नियोजन करताना पूरस्थितीमध्ये अडकणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचेही नियोजन केले आहे. आपत्तीत लोकांशी संपर्क साधण्यासह निर्माण झालेली आपत्ती दूर करण्यासाठी नियंत्रण कक्ष पुढील महिन्यापासून सुरू करण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. हा कक्ष चोवीस तास कार्यरत राहणार असून, त्या दृष्टीने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या ड्युटीचे नियोजनही करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

गाळ उपशाचा फायदा होणार का ? – दोन वर्षांपूर्वी अर्जुना-कोदवली नदीपात्रातील गाळ महसूल प्रशासन, नाम फाउंडेशन आणि नगरपालिकेच्या सहकार्याने काढण्यात आला. त्यासाठी जिल्हा नियोजनमधूनही निधी उपलब्ध झाला होता. अर्जुना-कोदवली नदीपात्रातील सुमारे पंधराशेहून अधिक घनमीटर गाळाचा उपसा होताना नदीपात्राची रूंदी आणि खोलीही वाढली होती. त्याचा गतवर्षी पावसाळ्यातील पूरस्थिती कमी होण्याला चांगलाच फायदा झाला. त्याचवेळी पूर्वीच्या तुलनेमध्ये तीव्रता आणि सातत्य कमी झाले होते. व्यापाऱ्यांचेही फारसे नुकसान झालेले नव्हते. यावर्षी जिल्हा नियोजनमधून उपलब्ध झालेल्या निधीतून अर्जुना-कोदवली नदीपात्रातील गाळाचा उपसा करण्यात आला आहे. त्यामुळे दोन-तीन वर्षातील गाळ उपशानंतर पूरस्थितीची नेमकी काय स्थिती राहणार? याची साऱ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular