27.6 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

वादळी वाऱ्याने गुहागरमध्ये मोठे नुकसान…

वादळी वाऱ्यासंह कोसळणाऱ्या पावसाने संपूर्ण गुहागर तालुक्याला...

आरजू टेस्कोल फसवणूक, संचालकांविरुद्ध दोषारोपपत्र

आरजू टेस्कोल कंपनीविरोधात गुंतवणकूदारांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात...

रत्नागिरी शहराचे वाटोळे करणाऱ्यांना घरी बसवा – बाळ माने

रत्नागिरी शहराच्या विकासाचा रोडमॅप भाजपकडे तयार आहे....
HomeChiplunआरवलीतील गरम पाण्याचे कुंड दुर्लक्षित, महामार्ग चौपदरीकरणाचा अडथळा

आरवलीतील गरम पाण्याचे कुंड दुर्लक्षित, महामार्ग चौपदरीकरणाचा अडथळा

दुरुस्ती केल्यास पर्यटकांची संख्या आणखीन वाढेल आणि आरवली गावच्या पर्यटनात भर पडेल.

चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदार संघात शेकडो कोटींची विकासकामे आतापर्यंत झाली; परंतु मुंबई-गोवा महामार्गालगत आरवली येथे असलेले गरम पाण्याचे कुंड दुर्लक्षित आहे. या कुंडाची दुरुस्ती केल्यास पर्यटकांची संख्या आणखीन वाढेल आणि आरवली गावच्या पर्यटनात भर पडेल. ब्रिटिशांच्या काळात मुंबई-गोवा मार्गाचे काम हाती घेण्यात आले. त्या काळात आजच्यासारखी यंत्रणा नसल्याने काम करणे आव्हानात्मक होते. डोंगर खोदणे आणि पूल उभारणे ही कामे प्रथम हाती घ्यावी लागली. आरवलीजवळ काळ्या पाषाणात पूल उभारण्याचे काम सुरू केले गेले.

त्या वेळी गडनदी पात्रालगत खोदकाम सुरू असताना २४ जानेवारी १९११ ला गरम पाण्याच्या साठ्याचा शोध लागला. गंधकमिश्रित या पाण्याचा उपयोग मार्गावरील प्रवाशांना, आरवली परिसरातील ग्रामस्थांना व्हावा या हेतूने या गरम पाण्याच्या साठ्याची स्त्री आणि पुरुषांसाठी दोन स्वतंत्र कुंडे बांधली गेली. या घटनेला तब्बल ११३ वर्ष पूर्ण झाली. मुंबई-गोवा महामार्गालगत हे गरम पाण्याचे कुंड आहे. मुंबईतून गोव्याला आणि गोव्यातून मुंबईकडे जाणारे पर्यटक येथे आवर्जून थांबतात; मात्र कुंडाची अवस्था पाहून कोणीही पाण्यात उतरत नाही.

चौपदरीकरणाचे काम करणारे ठेकेदार, कंपनीचे कामगार सकाळ-संध्याकाळ या कुंडामध्ये बेशिस्तपणे आंघोळ करताना दिसतात. आंघोळीच्या ठिकाणी ते कपडेही धुतात. परिसरातील महिला कपडे धुण्यासाठी येतात. खराब झालेले कपडे कुंडाच्या परिसरात फेकले जातात. कुंडाच्या परिसरात अस्वच्छता कायम असते. कुंडाच्या पाण्यात अंघोळ करायची झाली तरी कपडे बदलण्यासाठी सुरक्षित ठिकाण या परिसरात नाही. विजेची पुरेशी व्यवस्था नाही, रस्त्यावरून कुंडापर्यंत जाण्यासाठी पायवाट किंवा पाखाडी नाही. कुंडाची तात्पुरती देखभाल दुरुस्ती करावी यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी महामार्गाच्या ठेकेदार कंपनीकडे प्रयत्न केले होते. कंपनीने त्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधून देण्याची तयारी दर्शवली.

RELATED ARTICLES

Most Popular